Maharashtra News: बाबुराव केंद्रे यांना समता परिषदेची श्रद्धांजली

0
23

नांदेड (प्रतिनिधी) : कंधार येथील बहुजन समाजासाठी सदैव धडपड करणारे धडाडीचे सामाजिक व राजकीय कार्यकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव भगवान केंद्रे रा. हाडोळी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून अखिल भारतीय बहुजन समता परिषदेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कंधार येथे नोकरीनिमित्त असताना अखिल भारतीय बहुजन समता परिषदेचे अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांचा बाबुराव केंद्रे यांचेशी परिचय झाला. त्यानंतर मंडल आयोग चळवळ, आरक्षण आंदोलन, समाज प्रबोधन, विविध महामानवांचे जयंती कार्यक्रम आदी प्रसंगी बाबुराव केंद्रे यांची आवर्जून उपस्थिती राहायची. त्यांनी सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सदैव सहकार्य केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-म-रा-वि-वितरण-शाखा-वेंगु

मागील कांही दिवसांपासून बाबुराव केंद्रे हे आजारी होते व त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरु होते. शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या आकस्मिक निधनाने कंधार तालुकाच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील बहुजन समाजावर शोककळा पसरली आहे. गुरुद्वारा रोड येथे विपुल मल्टी सर्व्हिसेसच्या कार्यालयात तातडीची बैठक घेऊन इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here