Maharashtra news: म.रा.मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.५ वी व ८ वी साठी नव्याने प्रवेष घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता मुदतवाढ

3
286

पुणे: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ अंतर्गत जे विद्यार्थी नियमित शाळेत जावू शकत नाहीत , अशा विद्यार्थ्यांना थेट इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी मध्ये प्रवेश दिला जातो .यासाठी मंडळामार्फत ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरण्याचे आव्हान मंडळाचे प्र.सचिव श्री.माणिक बांगर यांनी केले आहे .मुक्त विद्यालय संकल्पनेतुन शिक्षणांपासुन वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होते .महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इ.पाचवी व इयत्ता आठवी साठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दि.8.11.2022 ते दि.21.11.2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्र.सचिव माणिक बागर महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांनी दिली आहे.या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज भरावा आणि कागदपत्र सादर करावीत असे जाहीर करण्यात आले आहे.

यासाठी सोमवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ (रात्री ११.५९ वाजेपर्यंत) विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरावा आणि अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र शाळेमध्ये बुधवार दि. २३ नोव्हेंबर २०२२ पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे जमा करावीत अशी सूचना देण्यात आली आहे.. या सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी सर्व केंद्र शाळांनी विभागीय मंडळात शुक्रवार दि. २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमा करावेत.

वरील नमुद कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इ. ५ वी व ८ वी. साठी प्रवेष घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत त्या वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी

महाराष्ट्र राज्यांमध्ये जे विद्यार्थी नियमित महाविद्यालयांमध्ये जावुन शिक्षण घेवू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना यशवंतराव मुक्त विद्यापीठ अंतर्गत पदवी धारण करु शकतात .मुक्त विद्यापीठांमध्ये पदवी / पदविका व इतर कोर्सेस उपलब्ध आहेत .परंतु शालेय अभ्यासक्रम मुक्त विद्यापीठांमधुन पुर्ण करता येत नाहीत . मुक्त विद्यापीठाच्या धर्तीवरच राज्यांमध्ये  मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे .