Maharashtra News: राज्यभरातील शाळा सॅटेलाइटने जाेडणार – दीपक केसरकर

0
24
युती तुटली कशी? केसरकरांचा खुलासा
युती तुटली कशी? केसरकरांचा खुलासा

सिंधुदुर्ग– काेराेनाकाळात आदिवासी आणि दुर्गम भागात ऑनलाइन शिक्षण देताना माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला हाेता. सरकारतर्फे राज्यभरातील सर्व शाळा सॅटेलाइटने जाेडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भविष्यात दुर्गम भागातील ऑनलाइन शिक्षण पद्धतीतील अडचणी दूर करण्यात येणार आहेत. राज्यभरात डिजिटल शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती शनिवारी राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

मातृभाषेतून शिक्षणामुळे फायदा

केसरकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही नवीन शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेणे शक्य होणार आहे. त्याचा इंजिनिअरिंग व मेडिकलच्या अभ्यासक्रमातही फायदा होणार आहे. तसेच इंग्रजी भाषेचा आपल्यावर असलेला पगडाही हळूहळू कमी होणार आहे. अनेक देशांत स्थानिक मातृभाषेतून शिक्षण घेत असल्याने ते शिक्षणात व आर्थिक सुबत्तेत अग्रेसर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here