Maharashtra news: स्पार्क मिंडाचे पुणे येथे भारतातील २८ व्या प्लांटचे उद्घाटन

0
15
स्पार्क मिंडाच्या पुणे येथे भारतातील २८ व्या प्लांटचे उद्घाटन

पुणे – मिंडा कॉर्पोरेशन लिमिटेड (“मिंडा कॉर्प” किंवा “कंपनी” म्हणून संदर्भित; NSE: MINDACORP, BSE: 538962), स्पार्क मिंडाच्या प्रमुख कंपनीने चाकण, पुणे येथे अत्याधुनिक वायरिंग हार्नेस प्लांटचे उद्घाटन केले. या नवीन ग्रीनफिल्ड सुविधेमुळे देशभरातील ग्रीनफिल्डची संख्या २८ वर पोहोचली आहे.

या उद्घाटन समारंभात बोलताना, श्री अशोक मिंडा, चेअरमन आणि ग्रुपचे CEO म्हणाले, “1958 मध्ये ग्रुपची स्थापना झाल्यापासून स्पार्क मिंडा यांनी खूप मोठा पल्ला गाठला आहे. आम्ही एकत्रितपणे जे काही उत्पादन करतो त्यामध्ये ग्राहक हा नेहमीच केंद्रस्थानी असतो. आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम उत्पादन प्रदान करण्याच्या उद्देशाने उत्कृष्टतेचा पाठपुरावा करण्यासाठी कार्य करतो. आमच्या विकसित होत असलेल्या तांत्रिक ज्ञानाने आणि या क्षेत्रातील अनुभवामुळे आम्ही सर्वसमावेशक असे उत्पादन ग्राहकांना उपलब्ध केल्यामुळे बाजारात अग्रणी राहण्यास मदत झाली आहे.”https://sindhudurgsamachar.in/maharashtra-news-शेतीच्या-वीज-पुरवठ्या/

ही नवीन-युगातील, अत्याधुनिक पर्यावरणपूरक सुविधा या बदलाचे नेतृत्व करेल. शून्य-दोष उत्पादनांवर लक्ष केंद्रित करून, हा प्लांट एकाधिक उत्पादन पॅरामीटर्सवर बेंचमार्किंग रीसेट करेल, आपले लक्ष उच्च करेल. हा प्लांट 100% सौर उर्जा निर्माण करण्यास सक्षम असून त्यामध्ये ग्रीनफील्ड सुविधा आहे. ही सुविधा स्पार्क मिंडाचे टिकाऊपणा आणि ESG पॅरामीटर्सवर यावर लक्ष केंद्रित करेल. 1.90 लाख चौरस फुटांमध्ये पसरलेला हा कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समर्थित प्रगत मशीन्सने सुसज्ज आहे. इतर वायरिंग हार्नेस प्लांट पुणे, पिल्लईपक्कम, कक्कलूर, म्हैसूर, मुरबाड, ग्रेटर नोएडा, पिथमपूर, हरिद्वार आणि व्हिएतनाम येथे आहेत.

मिंडा कॉर्पोरेशन (BSE:538962; NSE: MINDACORP)

मिंडा कॉर्पोरेशन ही भारतातील अग्रगण्य ऑटोमोटिव्ह घटक उत्पादक कंपन्यांपैकी एक असून या कंपनीचे संपूर्ण भारतातील स्थान आणि आंतरराष्ट्रीय स्थान लक्षणीय आहे. कंपनीची स्थापना 1985 मध्ये झाली. मिंडा कॉर्पोरेशन ही स्पार्क मिंडाची प्रमुख कंपनी आहे, जी पूर्वीच्या मिंडा ग्रुपचा भाग होती. कंपनीकडे वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आहे. या उत्पादनांमध्ये मेकाट्रॉनिक्सचा समावेश आहे, ऑटो OEM आणि कनेक्टेड सिस्टम आणि प्लास्टिक आणि इंटिरियर साठी या उत्पादनांसाठी कंपनीची माहती आहे . ही उत्पादने 2/3 चाकी वाहने, प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने, ऑफ-रोडर्स आणि आफ्टर-मार्केटची पूर्तता करतात. कंपनीकडे भारतीय आणि जागतिक मूळ उपकरणे उत्पादक आणि टियर-1 ग्राहकांसह वैविध्यपूर्ण असा ग्राहक वर्ग आहे.

नवीनतम तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी, मिंडा कॉर्पोरेशनकडे एक समर्पित R&D सुविधा आहे आणि ऑटोमोबाईल उद्योगातील अग्रगण्य आणि नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे मिंडा कॉर्पोरेशनला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांची पूर्तता करण्यासाठी उत्पादन डिझाइन आणि तंत्रज्ञानामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here