महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सन 2023 या वर्षाचे विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगामार्फत जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती सह सचिव जाहिरात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध स्पर्धांत्मक परिक्षा दरवर्षी घेतल्या जातात. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-शेतकऱ्यांना-हमीभावाने/
या परिक्षांचे नियोजन करताना, संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठ, परिक्षा घेणा-या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन, आयोगाने त्या परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित केले आहे. राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरू उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित परिक्षांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने सन 2023 या वर्षाचे वेळापत्रक तयार केले आहे. तरी राज्यातील सर्व होतकरु उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.



[…] […]