मुंबई दि. १५ नोव्हेंबर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबादचे भाऊसाहेब ठोंबरे व विजय ठोंबरे यांच्यासह अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
यावेळी पंकज ठोंबरे, विनायकराव गाडे, सत्यजित सोमवंशी, ऐराज शेख, अमृत शिंदे, भगतसिंह राजपूत, निलेश डाहके, नितीन थोरात, संदीप मोटे आदींसह इतरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात सहभागी झालेल्या सर्व नवीन सदस्यांचे स्वागत केले व पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अजितदादा पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. या पक्ष प्रवेशामुळे औरंगाबाद जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे. पक्षाची ध्येयधोरणे व कार्य तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहाल, अशा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आमदार व औरंगाबाद निरीक्षक अमरसिंह पंडित, औरंगाबाद ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील आदींसह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.