Maharashtra News: शिवसृष्टी’ प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा.

0
37

विलास कोळी.

पुणे : पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतील शिवसृष्टी ही अत्याधुनिक तंत्राचा उपयोग करून आंबेगाव बु. पुणे येथे अद्वितीय स्वरुपात साकार होत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाच्या प्रथम चरणाचा लोकार्पण सोहळा दि. २० नोव्हेंबर २०२२ रोजी मा. आमितभाई शहा, गृहमंत्री भारत सरकार, यांचे शुभ हस्ते होत असून, त्यासाठी प्रमुख उपस्थिती मा. एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री, श्रीमंत छत्रपति उदयनराजे भोसले, मा. मंगल प्रभातजी लोढा, मा. चंद्रकांत दादा पाटील अशा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी सुद्धा झालेली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठा ऐतिहासिक थिमपार्क म्हणजेच शिवसृष्टी प्रकल्प. आपण ज्या  प्रकल्पाची आतुरतेने वाट पाहत आहात. त्याची प्रतीक्षा आता संपली असून, त्यातील पहिला टप्पा सरकारवाड्यचे लोकार्पण . फस्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन या प्रमाणे ‘जाणता राजा’ या महानाट्यानंतर दुसरा जाणता राजा होणे नाही, त्याप्रमाणेच बाबासाहेबांच्या व सर्व विश्वस्तांच्या स्वप्नातील शिवसृष्टी नंतर अशी  शिवसृष्टी कोठेही होणे नाही. गेल्या १०० वर्षात असा वाडा महाराष्ट्रात कुठेहे बांधलेला नसेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड आणि लाकूड मागील १०० वर्षात कुणीही वापरलेले नसेल, अशी वास्तू महाराष्ट्रात नव्याने बांधलेली ही पहीलीच वास्तू असणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-news-जिल्हास्तरीय-शालेय-धनु/

वास्तू बनवण्याच्या आगोदर ती वास्तू कमीत कमी १०० वर्ष टिकावी या दृष्टीने विचार केला गेलेला आहे.  त्यासाठी काय प्रायोजन करावे लागते, हे पाहीले, तर, असे लक्षात येते की, शिवसृष्टीचे नियोजनबद्ध बांधकाम आणि कामकाज, हेच त्याचे मुख्य कारण आहे. स्थापत्य शास्त्रातील निष्णात तंत्रज्ञ त्यासाठी आहेत. शिवसृष्टी बांधकामाच्या शास्त्राचा विचार केला तर स्वता: काही ट्रस्टी या शास्त्रातील तज्ञ आहेत. त्यांनी नेमलेली शास्त्रांच्या संबंधित मंडळी ही त्या शास्त्रातील अतिकुशल अशीच आहेत. कल्पक व्यक्ती त्यासाठी नियुकत केलेल्या आहेत. सुरू असलेल्या या कामावर देखरेख ठेवण्यासाठी अनेक अधिकाऱ्याची गरज असे, असे अधिकारी प्रतिष्ठानकडे अनेक रत्ने आहेत,  सतरा आठरा वर्षे चालणारी शिवसृष्टी प्रकल्प बांधणीची ही प्रचंड कामे समर्थपणे तांत्रीक दृष्ट्या परीपुर्णतेने पेलु शकणाऱ्या व्यक्ती हाताशी आहेत. सत्य जर सुंदर रितीने मांडले तर ते आकर्षक होते, हा विश्वस्ताच्या कार्यकर्तृत्वाचा मुलभुत पाया.

बाबासाहेबांनी आणि सर्व विश्वस्तांनी हे एका रात्रीत पाहिलेले स्वप्न नाही. सुमारे पन्नास वर्षाची तपशर्या आणि अखंड साधना त्यामध्ये आहे. जे काही करायचे ते भव्य, दिव्य, उन्नत, आणि उत्तुंग करायचे ! हे स्वप्न साकार करण्याचे आव्हान आम्हीं स्विकारले आहे. आणि गेली १७-१८ वर्षे आम्हीं ही सेवा करत आहोत. स्वताला आम्ही भाग्यवान समजती की, एवढ्या मोठ्या २१ एकर मध्ये उभी रहात असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पामध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे सरकारकडून जागा ताब्यात घेण्यापासून, त्याचा आराखडा तयार करणे, टप्पा एक आणि टप्पा दोन मधील बांधकामचे भूमिपूजन करण्यापासून ते लोकार्पण पर्यंत आम्ही आहोत हे मी माझे भाग्य समजतो. ही कामगीरी ईश्वरानेच  आमच्या हातून करून घेतलेली आहे. असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आणि एवढ्या मोठ्या ऐतिहासिक प्रकल्पाचे साक्षीदार म्हणून आम्ही काम करत आहोत याचा आम्हाला अभिमान आणि आनंद सुद्धा होत आहे.

शिवचरित्राचा प्रसार आणि प्रचार, शिवचरित्रातून राष्ट्रीय कार्य घडावे या उत्तुंग ध्येयाने महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट १९६७ पासून कार्यरत आहे. आजच्या तरुण पिढीला आपला ज्वाजल्य इतिहास तितकाच प्रभावीपणे समजावा या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात ज्या किल्यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते अशा काही किल्यांच्या  प्रतिकृती तयार करून  त्या किल्ल्यांच्या मागे भव्य एलईडी स्क्रीन वर प्रोजेक्शनच्या सहाय्याने मँपिंग केलेले आहे.  आग्र्याहून सुटका, छत्रपती शिवाजी महाराजांचे भाषण, रायगड किल्याची हवाई सफर, शिवराज्याभिषेक, शस्त्रास्त्रे व पेंटिंग्ज प्रदर्शन ह्यासाठी  होलोग्राफी, अँनिमेट्रोनिक्स, मोशन सिम्युलेशन, ३ डी, ४ डी प्रोजेक्शन तंत्रज्ञान, मिनी चिअर्स, मँपिंग, लाईट & साऊंड शो. अशा पद्धतीचे तंत्रज्ञान भारतात पहिल्यांदाच तेही शिवसृष्टी मध्ये वापरलेले आहे.  

आपण शिवसृष्टी मध्ये आलो की काही सेकंदात आपण ३५० वर्षे मागे जाणार आहोत. विविध प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान वापरून हे आपण साकार करत आहोत. तरी आपण  शिवसृष्टी ला एकदा नक्की भेट द्या.

धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here