Maharashtra: Puma कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री करणार्‍या दुकानावर छापा; 8 लाखांचा बनावट माल जप्त

0
18
Puma कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री
Puma कंपनीचा लोगो वापरुन बनावट मालाची विक्री

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारl पुणे l 05 डिसेंबर

पुमा (Puma) कंपनीचा लोगो वापरुन बनावट बॅग, टिशर्ट, स्पोट्स शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्टची विक्री करणार्‍या दुकानावर पोलिसांनी छापा घालून ८ लाख रुपयांचा बनावट माल जप्त केला आहे. https://sindhudurgsamachar.in/प्रसिध्द-मातोंड-श्री-देव/

स्टाइलॉक्स फॅशन हब (रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव बुद्रुक, कात्रज पुणे) या दुकानमालकावर आंबेगाव पोलीस ठाण्यात कॉपीराईट अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ब्रॅन्डेड कंपनीचा बनावट मालाची विक्री होत असल्याबाबतची माहिती मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलिसांची पुमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधीमार्फत पुणे शहरात शोध मोहिम सुरु होती. आंबेगाव बुद्रुक येथील स्टाइलॉक्स फॅशन हब या दुकानात बनावट मालाची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. पुमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी या दुकानावर छापा घातला.

सदर दुकानात मोठ्या प्रमाणावर पुमा या ब्रॅन्डेड कंपनीचे लोगो वापरुन बॅग, टि शर्ट, स्पोट्स शुज, स्लाईडर चप्पल, जॅकेट, ट्रॉव्हझर, बॉक्सर पॅन्टची विक्री सुरु होती. या दुकानातून ८ लाख २ हजार ६०० रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here