Maharashtra: RBI ने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना मिळणार विनातारण कर्ज

0
16
RBI,loan,
आरबीआयने शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार विनातारण कर्ज

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
मुंबई/ब्युरो न्यूज: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काही धोरणात्मक निर्णय घेत असताना शेतकऱ्यांसाठी खास निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये आरबीआयने शेतकऱ्यांसाठी कर्जाचे नियम काही प्रमाणात सोपे केले आहेत. RBI ने शेतकऱ्यांसाठी कोणत्याही हमीशिवाय कृषी कर्जाची मर्यादा ही 2 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मर्यादा फक्त 1.60 लाख रुपये इतकी होती. त्यामुळे आता शेतकऱ्यांना कर्ज घेताना कोणतीही वस्तू गहाण ठेवावी लागणार नाहीये. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

याआधी शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी काही गोष्टी गहाण ठेवाव्या लागत होत्या. परंतु, आरबीआयने आता यामध्ये काही बदल केला आहे. विनातारण शेतकऱ्यांना मिळणार कर्जवाढत्या महागाईपासून आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आरबीआयने विनातारण 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे. ज्याची पहिली मर्यादा ही 1.6 लाख रुपये इतकी होती. पतधोरण आढाव्याबाबत माहिती देत असताना RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती आणि महागाई लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा वाढवली आहे. यामुळे अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असं ते म्हणाले. ttps://sindhudurgsamachar.in/maharashtra-शहरामध्ये-चालू-असलेले-अ/

आरबीआयने 2010 मध्ये कृषी क्षेत्राला कोणत्याही हमीशिवाय 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यामध्ये वाढ करून ती मर्यादा 1.6 लाख रुपये इतकी केली. अशातच आता ही मर्यादा 2 लाख रुपये इतकी केली आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच आरबीआयकडून जारी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here