मुंबई – १ एप्रिल २०२४: मुंबईतील मुलांचे अनोखे संग्रहालय असलेल्या म्युझियम ऑफ सोल्युशन्सने नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्समध्ये असलेल्या SOI म्युझिक अकादमीशी सहयोग केला असून SOI म्युझिक अकादमीच्या ३१ मुलांचा “रिदम्स अँड मेलडीज फ्रॉम बॅरोक टू पॉप” हा ९० मिनिटांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमामध्ये १० वर्षांखालील १२ मुले सहभागी होणार असून त्यात बाख, स्ट्रॉस, दिमित्री शोस्ताकोविच पासून जॉन विल्यम्स यांच्या हॅरी पॉटरच्या हेडविगच्या थीमपर्यंत कालातीत अभिजात कलाकृती असणार आहेत. या काही अजोड कलाकृती लहान मुले सादर करणार आहेत: https://sindhudurgsamachar.in/kokan-कुलर-वापरताना-विद्युत-सु/
अनु. क्र. कलाकृतीचे नाव सादरीकरण कलाकार
१. बाख द्वारे “एअर” गायन कलाकार
२. त्चैकोव्स्की द्वारे “वन्स अपॉन अ ड्रीम” गायन कलाकार
३. ड्यूक एलिंग्टन द्वारे “इट डोन्ट मीन अ थिंग” गायन कलाकार
४. डॉल्झिकोव्ह द्वारे “फोक सुट” पर्क्यूशन एन्सेम्बल
५. शोस्ताकोविच द्वारे “वॉल्ट्ज जोक” पर्क्यूशन एन्सेम्बल
६. कसिनी द्वारे “एव्ह मारिया” पर्क्यूशन एन्सेम्बल
७. स्ट्रॉस द्वारे “पोल्का पिझिकाटो” पर्क्यूशन एन्सेम्बल
८. जॉन विल्यम्सची “हेडविग थीम” पर्क्यूशन एन्सेम्बल
९ शैन्स्की द्वारे “चुंगा-चांगा” पर्क्यूशन एन्सेम्बल
१०. खचातुरियनचा “सब्रे डान्स” पर्क्यूशन एन्सेम्बल
म्युझियम ऑफ सोल्युशन्स आणि SOI म्युझिक ॲकॅडमी यांच्यातील सहकार्यामुळे या लहान मुलांना NCPA च्या बाहेर वेगळ्या ठिकाणी सादरीकरण करण्याची अनोखी संधी मिळत आहे. SOI चे संगीत संचालक मारत बिसेंगलीव यांच्या मते, “तरुण कलाकारांना सादरीकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे SOI म्युझिक अकादमीचे एक महत्त्वाचे काम आहे. MuSO मधील सादरीकरण विद्यार्थ्यांसाठी एक सामूहिक जागा निर्माण करेल, जिथे त्यांना त्यांच्या समवयीन कलाकार आणि संगीत यापासून प्रेरणा मिळेल. यासारखे सहकार्य नवीन प्रतिभा ओळखण्यास आणि मैत्री बनविण्यास सक्षम करते.”
MuSo चे मुख्य संग्रहालय अधिकारी मायकल पीटर एडसन म्हणाले, “ लहान, तरुण मुळे ही नैसर्गिक नवोन्मेषक, नवनिर्मिती करणारे असतात याची MuSo येथे आम्हाला नेहमी आठवण करून दिली जाते. तंत्रज्ञान, सक्रियता किंवा कला अशी कोणतीही गोष्ट असो त्यांना सीमा ओलांडायला, नवनवीन गोष्टींचा शोध घ्यायला, त्यात वाढ करायला आवडते. म्हणूनच आम्ही SOI म्युझिक अकादमीसह ही संध्याकाळ व्यतीत करायला खूप उत्सुक आहोत. तरुण लोकांच्या सर्जनशीलतेवर आणि नवीन मार्गांनी जग पाहण्याच्या त्यांच्या क्षमतेवर ते प्रकाश टाकतात.”
म्युझियम ऑफ सोल्युशन्समध्ये सादरीकरण करण्यासाठी लहान मुलांना ओल्गा व्यखोडत्सेवा आणि इगोर अवदीव यांनी प्रशिक्षण दिले आहे.
१. ओल्गा व्यखोडत्सेवा- एक अनुभवी संगीत संयोजक आणि गायन शिक्षिका. कुर्मगाझीच्या नावावरुन ठेवलेल्या अल्माटी स्टेट कंझर्व्हेटरीमधून त्यांनी पदवी प्राप्त केली आणि गेसिन मॉस्को अकादमीमध्ये कौशल्य विकास केला. त्या जगभरातील अनेक गायक कलाकार मंडळी आणि व्होकल समारंभांची लीडर आहेत. (जर्मनी, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, जपानमध्ये त्यांचे कार्यक्रम, मैफिली होतात) आणि त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत त्यांनी अल्माटी गायकांमध्ये गायन मास्टरची पदे भूषवली आहेत. त्यात सेंट पीटर्सबर्ग कॉइर थिएटर मधील कॉइरमास्टर पदाचा समावेश आहे. ओल्गा यांनी कझाक नॅशनल अकॅडमी ऑफ आर्ट्स, पी.आय. त्चैकोव्स्की यांच्या नावावरून असलेले अल्माटी कॉलेज ऑफ म्युझिक, अल्माटी येथील हॅलीबरी स्कूल आणि त्रिवेंद्रम अकादमी ऑफ वेस्टर्न म्युझिक येथे अध्यापन केले आहे. मुंबईत, २०२१ पासून त्या SOI म्युझिक अकादमी कॉयर येथे शिक्षिका आणि NCPA कोरसच्या संगीत दिग्दर्शक आहेत. दोन्ही कॉयरनी मारत बिसेंगलीयेव (जेबीटी थिएटर, एनसीपीए) यांच्या दिग्दर्शनाखाली के.जेनकिन्स रिक्वेमच्या निर्मितीमध्ये भाग घेतला आणि मैफिलीच्या उपक्रमांमध्येही ते सतत सक्रिय असतात.
२. इगोर अवदीव – एक तालवादक आहे. मोगिलेव्ह (बेलारूस) येथे १९६३ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी १९७५ मध्ये संगीत शिक्षण सुरू केलं. १९८३ मध्ये त्यांनी मोगिलेव्ह म्युझिक कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. १९८३ – 2000 – बेलारशियन अकादमी ऑफ म्युझिकमध्ये अभ्यास केला. १९८६-२००४ मध्ये रिपब्लिक ऑफ बेलारूसच्या बोलशोई ऑपेरा आणि बॅले थिएटरचा तालवाद्य गटात काम केले. २००४-२०२२ पर्यंत – रिपब्लिक ऑफ बेलारूसच्या स्टेट सिम्फनी ऑर्केस्ट्रामध्ये काम केले. २०२२ पासून आत्तापर्यंत ते सिम्फनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडियासोबत काम करत आहेत. त्यांनी बेलारूस, लिथुआनिया, रशिया, पोलंड इत्यादी ठिकाणी अनेक सर्जनशील समूहांसोबत सहकार्य केले आहे. त्यांनी कोव्हेंट गार्डन, कॅडोगन हॉल, सनटोरी हॉल, बर्लिन फिलहारमोनिक इत्यादी विविध वाद्यवृंदांसह सादरीकरण केले आहे. त्यांनी ग्रिग पर्क्यूशन समूहाचे नेतृत्व केले. त्यामध्ये २००७ मध्ये रेडिओ फ्रान्सवर सी.डी.चा समावेश होता.
मुंबईतील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले: मुंबईच्या शालेय विद्यार्थ्यांना रविवारी ७ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता कॉमन्स येथे आयोजित केलेल्या विशेष शोमध्ये सहभागी होता यावे यासाठी म्युझियम ऑफ सोल्युशन्स डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. पालक त्यांच्या मुलांची नोंदणी संग्रहालयाच्या डिजिटल प्लॅटफॉर्म https://www.museumofsolutions.in द्वारे देखील करू शकतात.