मुंबई, मार्च 18, 2024: TVS मोटर, दुचाकी आणि तीन-चाकी वाहने तयार करणाऱ्या अग्रगण्य जागतिक कंपनीने TVS RONIN टेस्ट-राइड क्रिकेट मोहिमेच्या 5 शहरांमधील विजेत्यांचा सत्कार केला. https://sindhudurgsamachar.in/koan-कंपोष्ट-डेपोतील-शेती-उत्/
देशात क्रिकेट वर्ल्ड कप फिव्हर साजरा करण्यासाठी, TVS RONIN ने 2023 क्रिकेट वर्ल्ड कप दरम्यान शुभमन गिल अभिनीत #MoveLikeARonin नावाची मोहीम सुरू केली. या मोहिमेचा एक आव्हानात्मक टप्पा म्हणजे टेस्ट-राइड क्रिकेट, यामुळे मोटारसायकलप्रेमींना TVS RONIN ची चाचणी घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. बाईकप्रेमींसाठी ही मोहीम म्हणजे मैदानी क्रिकेटचा अशा प्रकारचा पहिलाच अनुभव होता. याअंतर्गत त्यांनी मोटरसायकलवरील चाचणी राइड्स आणि क्विझच्या आधारे धावा केल्या. देशभरात राबवण्यात आलेल्या या मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. भारतातील TVSM डीलरशिपवर शेकडो TVS RONIN प्रेमींनी सहभाग नोंदवला.
सर्वोच्च स्कोअर करणाऱ्यांना सन्मानित करण्यासाठी, TVS RONIN ने देशभरातील 5 विजेत्यांना मोटरसायकलची विश्वचषक आवृत्ती देत त्यांचा गौरव केला. यामुळे ते जगातील एका खास वास्तूचे मालक झाले आहेत. TVS RONIN ही पहिली ‘मॉडर्न-रेट्रो’ मोटरसायकल आहे, जी थोडे हटके थोडक्यात, #अनस्क्रिप्टेड जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. ड्युअल-चॅनल एबीएस, रेन अँड अर्बन एबीएस मोड्स, व्हॉइस असिस्टन्ससह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि बरेच काही यासारख्या नवीन-युगातील तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याने, ही मोटरसायकल वैशिष्ट्ये आणि शक्तिशाली कामगिरीने परिपूर्ण आहे.
या प्रसंगी श्री. विमल सुंबली, हेड बिझनेस – प्रीमियम, टीव्हीएस मोटर कंपनी म्हणाले, “टीव्हीएस रोनिनसाठी टेस्ट-राइड क्रिकेट उपक्रमापेक्षा दुसरी कोणतीच समर्पक वेळ नव्हती. शुभमन गिल या मोहिमेचा चेहरा असल्याने, आम्ही आमच्या डीलरशिपवर टेस्ट राइड्ससाठी वर्ल्ड कप फिव्हरचा प्रभावीपणे उपयोग करू शकलो. याला इतका प्रतिसाद मिळाला आणि रायडर्समध्ये एवढा उत्साह होता की ज्याने रायडर्सना पारंपरिक चाचणी-राइड्सच्या पलीकडे जाणारा एक गेमिफाइड अनुभव दिला. TVS Ronin च्या #अनस्क्रिप्टेड जगात नवीन रायडर्सला आकर्षित करण्यासाठी आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतल्याचा मला आनंद होतो आहे. मर्यादित विश्वचषक संस्करण TVS RONIN च्या 5 विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. अशीच अनेक # अनस्क्रिप्टेड आव्हाने तुमची वाट पाहत आहेत.”
हा समारंभ चेन्नई, मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुवाहाटीमधील TVS डीलरशीप केंद्रांमध्ये झाला. या कार्यक्रमासाठी शहरातील स्पर्धकांना आमंत्रण देण्यात आले होते. आणि विजेत्यांना मोटारसायकल देण्यात आली. या कार्यक्रमाने मोटो-उत्साही, प्रभावशाली आणि माध्यम कर्मचारी एकत्र आणले. त्यांनी एकत्रितपणे विजेत्यांचे अभिनंदन केले तसेच TVS RONIN द्वारे #Unscripted लिव्हिंग अशी मोहीम राबवणाऱ्या TVS चे कौतुक केले.