पुणे: अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य,हेवली तालुका कार्याध्यक्ष पदी श्री. विलास कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबतचे पत्र श्री. संतोष झिपरे प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते श्री. विलास कोळी यांना देण्यात आले. महाराष्ट्रातील गड, किल्ले, गढ्या, वाडे यांचा इतिहास आणि त्याचे संशोधन याकरिता काम करत आहात त्याचाच उपयोग समाजाला व्हावा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ संलग्न इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य, हेवली तालुका कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सुखटणवाडी-येथे-दशावतार/
आपल्या कारकीर्दीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, संशोधन आणि संवर्धन क्षेत्रासाठी सतत कार्यरत राहावे आपल्या कार्याची दिशा इतिहास आणि त्याचे संशोधन हिताची व संघटनेच्या चौकटीत राहून शिस्तबद्ध काम करणारी राहील ही अपेक्षा ठेवून आपल्या कार्यक्षेत्रात संघटनात्मक बांधणी करावी.
श्री. विलास कोळी यांनी सामाजिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यांनी रायगड, प्रतापगड, पन्हाळा, सिंहगड, सज्जनगड, परंडा येथील गडकिल्यांवर जावून त्यांचे डॉक्युमेंटेशन केलेले आहे. वाडा, वाडा कसा पहावा, कोरोना व्हायरस चिंतन अशी त्यांची एकूण तीन पुस्तके प्रकाशित आहेत. https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-बॉलिवूडचा-लोकप्/
पाणी फाउंडेशन, जल संवर्धन श्रमदानामध्ये भाग घेणे, झाडे लावा झाडे जगवा असे कार्यक्रम श्री. विलास कोळी यांनी राबविलेले आहेत. त्यांना लेखन स्पर्धेत अनेक प्रमाणपत्रे मिळालेली आहेत. अनेक विद्यापीठाच्या आर्ट आणि आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात वाडा हे पुस्तक आहे. आर्ट आणि आर्किटेक्चर, इंजिनिअरींग, आर्किओलॉजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा अनुभव अशी त्यांची ओळख आहे.
मा. रणजीतदादा जगताप (अखिल भारतीय मराठा महासंघ युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांनी श्री. विलास कोळी यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

