नागपूर : नागपूर जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या २५ शाळा बॉम्बे हाय कोर्ट नागपूर बेंच मध्ये थकित पाच वर्षाची आरटीई प्रतिपूर्ती मिळणे करीता दि ०५ जुलै २०२१ रोजी याचिका दाखल केली असता दि.१६ ऑक्टोबर २०२३ ला हाय कोर्टाने २५ शाळांना थकित प्रतिपूर्ती चार आठड्यांत देण्याचे आदेश राज्य शासनास देऊन महत्वपूर्ण निकाल दिला, अशी माहिती आरटीई फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. सचिन काळबांडे यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मराठी-वृत्तपत्र-लेखक-सं-2/
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण अधिनियान्वये राज्यातील ९५३४ शाळांनी जवळपास ६ ते १४ वयोगटातील ५ लाख विद्यार्थ्यांना सदर कायद्यांतर्गत मोफत शिक्षण वर्ष २०१२-१३ पासून आजपावेतो देत आहे, परंतु शासनाने शाळांना कायद्यात तरतूद असूनही प्रतिपूर्ती रक्कम नियमित न दिल्याने शाळांवर आर्थिक ओझे लादण्याचे कार्य केले, त्यामुळे जवळपास पाच वर्षाचा निधी थकित राहिल्याने आरटीई फाउंडेशन संघटने मार्फत विविध आंदोलन करण्यात आले ज्यामध्ये नागपूर, पुणे, मुंबई मंत्रालय, दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन करून शासनास सतत पाठपुरावा केला, वर्ष २०२२मध्ये हिवाळी अधवेशनादरम्यान नागपूर येथे विधान सभेवर भव्य मोर्चा काढला ,परंतु शासनाने पाहिजे तसा प्रतिसाद न दिल्याने कोर्टात जाणे भाग पडले.
रस्त्यावर तसेच कोर्टात दोन्ही बाजूने लढाई लढून माहिती अधिकारांतर्गत माहिती गोळा करून शासनास जेरीस आणले, अधिकारी वर्ग वैतागून इतरत्र बदली करून घेतली, परंतु लढा सुरूच ठेवला, राज्यातील इतर ही संघटना सोबत सामंज्याने विविध आंदोलने पार पाडली, शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री , केंद्रीय शिक्षण मंत्री ह्यांना वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला, राज्यातील १० हजार कोटीचा शिक्षण निधी पचित झाला ही बाब उघड केली.
आज न्यायालयाने नागपूर येथील २५ शाळांच्या बाजूने निकाल दिला , संघटने कडून ऍड. भानुदास कुळकर्णी ह्यांनी कायदेशीर भक्कम बाजू मांडली,*हा विजय फक्त २५ शाळांचा नसून राज्यातील सर्व ९५३४ शाळांचा हा विजय आहे
या लढ्याला आपण सर्वांनी वेळोवेळी दिलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य होऊ शकले , या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील थकीत प्रतिपूर्ती मुळे त्रस्त असलेल्या राज्यातील संस्थाचालकांना नागपूर जिल्ह्याच्या निमित्ताने आपला हक्काचा निधी मिळणेस सोपी होईल,संघटने चे उपाध्यक्ष राम वंजारी, डॉ एस.सी. गुल्हाने, रमेश डोकरीमारे, दिनेश चन्नावार, अनुपमा दास, मेंघरे मॅडम, गजानन उमरेडकर , संजय महाकाळकर,दिलीप जाधव,प्रदीप सुतोने,प्रकाश नेऊलकर, मुजीब पठाण, कांचन मुदगल, बाबा नंदापवार, विजय अगडे, राजेंद्र अतकर,शाहबाझ शेख, पूनित जेजानी, अनुप शहा, विरेश आस्टणकर,राजेश सलामे ,नितीन वडणारे ,पंकज चोरे, रेणुका चोरे यांचे सहकार्य लाभले, त्यासाठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करून *राज्यातील सर्व शाळांना न्याय मिळणेस प्रयत्न करण्याचे आश्वासन प्रा.सचिन काळबांडे यांनी दिले.