Maharashtra: इथेनॉल मिश्रित डिझेल आणि फ्लेक्स इंधन कार्यक्रमामध्ये भारत पेट्रोलियम अग्रणी, शाश्वत वाहतुकीमध्ये क्रांती

0
50
इथेनॉल,भारत पेट्रोलियम ,
इथेनॉल मिश्रित डिझेल आणि फ्लेक्स इंधन कार्यक्रमामध्ये भारत पेट्रोलियम अग्रणी, शाश्वत वाहतुकीमध्ये क्रांती

·        बीपीसीएल पर्यायी इंधनाचा प्रचार करून आणि कार्बन उत्सर्जन कमी करून शाश्वत इंधन उपायांसाठी वचनबद्धता दाखवते.

·        उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये फ्लेक्स इंधन (२७% इथेनॉल मिश्रित पेट्रोल आणि ई२७ आणि ८५% इथेनॉल मिश्रित पेट्रोल) भरलेल्या मोटर सायकलींनी आणि ईडी७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) इंधन भरलेल्या बसेसनी या नावीन्यपूर्ण इंधन  पर्यायांची क्षमता दर्शविली. 

·        हा प्रायोगिक कार्यक्रम या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा आहे, जो स्वच्छ, हरित व शाश्वत भविष्याच्या दिशेने बीपीसीएलचे नेतृत्व आणि कल्पकता दाखवतो.

मुंबई: ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अशोक लेलँड यांनी ईडी ७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) इंधनाची परिणामकारकता तपासण्यासाठी एक पथदर्शी कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारताच्या जैव-इंधन अर्थव्यवस्थेमध्ये बदल घडवून आणणे आणि स्थिर ऊर्जा मिश्रण मिळवणे आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-रेडी-येथील-ऐतिहासिक-यशवं

    बीपीसीएलच्या संशोधन व विकसन विभागाने विकसित केलेले ईडी ७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) इंधन मिश्रणामध्ये ९३% डिझेल आणि ७% इथेनॉल आहे. अशोक लेलँडच्या सहभागीदारीमध्ये या मिश्रणाची इंजिन चाचणी बेंचवर कठोर चाचणी आणि प्रमाणीकरण केले आहे.

    बीपीसीएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. जी. कृष्णकुमार म्हणाले, नेट झीरो बबत भारताच्या वचनबद्धतेचा 

पाठपुरावा करून बीपीसीएल स्वच्छ इंधन विकास कार्यक्रमांतर्गत अग्रगण्य वाहन उद्योग ओईएम, अशोक लेलँड आणि हिरो मोटोकॉर्प यांच्या सहकार्याने शाश्वत इंधन पर्याय विकसित करीत आहे. बीपीसीएलने देशभरातील अनेक शहरांमध्ये ई २० चा पुरवठा सुरू केला आहे. अशोक लेलँडच्या बसेससाठी प्रायोगिक तत्वावर ईडी ७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) आणि हिरो मोटोकॉर्पसोबत दुचाकी वाहनांसाठी फ्लेक्स इंधन (ई२७ आणि ई ८५) चा आजचा उद्घाटन समारोह म्हणजे बीपीसीएलने आपल्या देशाच्या आयात बिल कमी करण्याच्या आणि टिकाऊपणा प्रदान करण्याच्या उद्देशाने उचललेले पाऊल आहे. इथेनॉलचा वाढत वापर शेतकऱ्यांना अन्नदाता पासून ऊर्जादाता मध्ये बदलण्यास सक्षम करतो. या जागतिक पर्यावरणदिनी, बीपीसीएल चांगल्या भविष्यासाठी स्वच्छ इंधनकडे वाटचाल करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

    बीपीसीएलचे संचालक (विपणन) श्री. सुखमल जैन म्हणाले, “बीपीसीएल इंधन रिटेलिंग उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे, जे शाश्वत भविष्यासाठी  परिवर्तन घडविण्यात नेतृत्व करत आहे. ईडी ७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) आणि फ्लेक्सी इंधनाचा प्रायोगिक उपक्रम हा मोठी शेती करणाऱ्या लोकसंख्येच्या आर्थिक समृद्धीसाठी आणि भारताच्या जीडीपीमध्ये योगदान देण्यासाठी आणि हरित व स्वच्छ भविष्याच्या दृष्टीने बदल घवून आणण्यासाठी एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे.”

    अशोक लेलँडने ईडी ७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) इंधन वापरुन त्यांच्या इंजिनवर विस्तृत प्रमाणात प्रयोगशालेय चाचण्या केल्या. ईडी ७ (७% इथेनॉल मिश्रित डिझेल) इंधन मिश्रण प्रदूषण पटलीमध्ये उल्लेखनीय घट दर्शवते, ज्यामध्ये कण द्रव्य (पार्टीक्युलेट मॅटर) आणि नायट्रोजन ऑक्साइड (NOx) यांचा समावेश आहे. इंजिनमध्ये कोणतेही महत्वपूर्ण बदल न करता हे मिश्रण डिझेल वाहनांद्वारे सहजपणे स्वीकारले जाऊ शकते. या प्रायोगिक उपक्रमानंतर इंधनाच्या व्यावसायिक अंमलबजावणीसाठी एक मार्गदर्शक योजना विकसित करण्यासाठी एक सर्वसमावेशक अहवाल एआरएआय (ARAI), रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाला सादर केला जाईल. भारतात इथेनॉल सहज उपलब्ध असल्याने देशासाठी ऊर्जा बील कमी करण्याच्या उद्देशाने, डिझेलमध्ये इथेनॉलचे मिश्रण ७% पर्यंत स्थापित करण्याचे लक्ष्य या अभ्यासात आहे.

    हीरो मोटोकॉर्प ने आपल्या दळणवळणातील भविष्य बनण्याच्या आपल्या ध्येयातून जयपूरमधील सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) येथे फ्लेक्स इंधन प्रोटोटाइप विकसित केला आहे. १२५ सीसी बीएस ६  इंजिनसह सुसज्ज असलेले वाहन २०% (ई२०)ते ८५% (ई८५)इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिश्रणावर चालू शकते. फ्लेक्स इंधन प्रोटोटाइप हे इंधन मिश्रणातील इथेनॉल मिश्रण शोधण्यासाठी प्रगत सॉफ्टवेअरचा वापर करते आणि त्यानुसार इंजिन कंट्रोल पॅरामीटर्स समायोजित करून त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करते. संपूर्ण मिश्रण श्रेणीमध्ये इंजिनची कार्यक्षमता आणि उत्सर्जन यावर काहीही परिणाम होत नाही.

          बीपीसीएल, अशोक लेलँड आणि हिरो मोटोकॉर्पचे उपक्रम भारत सरकारच्या अक्षय इंधन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि आर्थिक स्थिरता वाढविण्याच्या दृष्टिकोनाशी पूरक असून भारताच्या हरित व शाश्वत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी महत्वपूर्ण टप्पे दर्शवितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here