Maharashtra : एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण

0
20
एएलडी ऑटोमोटिव्ह
एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण केले असून स्थानिक व्यवस्थापनामध्ये बदलांची घोषणा केली आहे

स्थानिक व्यवस्थापनामध्ये बदलांची घोषणा केली आहे

मुंबई – एएलडी ऑटोमोटिव्हने लीजप्लॅनचे १००% अधिग्रहण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. लीजप्लॅन ही ताफा व्यवस्थापन आणि मोबिलिटी क्षेत्रातील जगातील एक आघाडीची कंपनी आहे. एएलडी ऑटोमोटिव्हने टीडीआर कॅपिटलच्या नेतृत्वाखालील एका कंपनी समूहाकडून लीजप्लॅनचे अधिग्रहण केले आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-ड्रीम-११-कप-१४-वर्षाखा-2/

हे परिवर्तनात्मक अधिग्रहण कंपनीच्या वाटचालीतील एक खूप मोठा बदल दर्शवते. अधिग्रहणानंतर एकत्र आलेल्या या दोन्ही कंपन्यांकडून जगभरात व्यवस्थापित केल्या जात असलेल्या वाहनांची एकूण संख्या ३.३ मिलियन झाली असून, आता हा सस्टेनेबल मोबिलिटी क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीचा उद्योगसमूह बनला आहे. एएलडी ऑटोमोटिव्ह आणि लीजप्लॅन एकत्र मिळून नेट झिरो उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या वाटचालीचे नेतृत्व करतील व या उद्योगक्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला आकार देतील. या दोन्ही कंपन्या मिळून एकमेकांना अनुरूप असलेल्या वृद्धी क्षमतांच्या बळावर आपली स्पर्धात्मकता मजबूत करतील आणि शाश्वत वृद्धी साध्य करतील.

हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, एएलडी ऑटोमोटिव्ह आणि लीजप्लॅन एक कंपनी म्हणून एकत्र येण्याची प्रक्रिया भारतात सुरु करतील. नियामक मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल.भारतामध्ये या कंपनीच्या धोरणात्मक विकासाचे नेतृत्व करण्यासाठी एएलडी ऑटोमोटिव्हचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर टीम अल्बर्टसॅन यांनी भारतामधील एएलडी ऑटोमोटिव्हचे माजी जनरल मॅनेजर श्री सुवजित कर्माकर यांना कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर व एशिया सब-रिजनल डायरेक्टर म्हणून मलेशिया व थायलंडमधील समूहाच्या व्यवसायावर लक्ष ठेवण्यासाठी नियुक्त केले आहे. ही नियुक्ती तातडीने लागू करण्यात आली आहे.

एएलडी ऑटोमोटिव्ह आणि लीजप्लॅन एकत्र येऊन तयार होणाऱ्या कंपनीच्या आव्हानात्मक एकत्रीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि येत्या महिन्यांसाठी व वर्षांसाठी उद्दिष्ट म्हणून ठरवण्यात आलेली धोरणात्मक विकास वृद्धी यशस्वीपणे साध्य करण्यासाठी निवडण्यात आलेल्या प्रमुख प्रतिभावंतांमध्ये श्री. सुवजित कर्माकर यांचा समावेश आहे. 

माहिती
श्री. सुवजित कर्माकर हे एएलडी ऑटोमोटिव्ह इंडियासोबत २००५ पासून कार्यरत आहेत.  सेल्स आणि मार्केटिंगचे कंट्री हेड म्हणून त्यांनी कंपनीत पदार्पण केले, जानेवारी २०१३ मध्ये त्यांना कंपनीचे सीईओ आणि पूर्णकालीन डायरेक्टर पद देण्यात आले. एएलडी ऑटोमोटिव्हमध्ये येण्याआधी श्री. सुवजित यांनी आयसीआयसीआय बँक, व्हर्लपूल ऑफ इंडिया आणि फिलिप्स इंडिया (कन्ज्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन) यांच्यासोबत काम केले होते. कम्प्युटर सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर श्री. सुवजित यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

एएलडी ऑटोमोटिव्ह | लीजप्लॅन
एएलडी ऑटोमोटिव्ह | लीजप्लॅन ही सस्टेनेबल मोबिलिटी अर्थात शाश्वत गतिशीलता क्षेत्रातील जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या, लघु व मध्यम उद्योजक, व्यावसायिक आणि व्यक्ती यांचा समावेश असलेल्या आपल्या ग्राहकवर्गाला फुल-सर्व्हिस लीजींग, लवचिक सबस्क्रिप्शन सेवा, ताफा व्यवस्थापन सेवा आणि मल्टी-मोबिलिटी सुविधा पुरवते. तब्बल ४४ देशांमध्ये थेट उपस्थितीसह सर्वात मोठे कव्हरेज असलेली एएलडी ऑटोमोटिव्ह | लीजप्लॅन नेट झिरो उद्दिष्टापर्यंतच्या वाटचालीचे नेतृत्व करण्यासाठी आणि नावीन्य व तंत्रज्ञान-सक्षम सेवांमार्फत उद्योगक्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला आकार देण्यासाठी आपल्या या स्थानाचा उपयोग करून घेत आहे.  पर्यावरणपूरक गतिशीलतेचा स्वीकार जास्तीत जास्त प्रमाणात केला जावा यासाठी सक्षमता निर्माण करण्यासाठी ही कंपनी कार्यरत आहे.

जगभरात १५७०० कर्मचारी असलेली एएलडी ऑटोमोटिव्ह | लीजप्लॅन ३.३ मिलियन वाहनांचे व्यवस्थापन करते (मार्च २०२३ च्या अखेरीसच्या आकडेवारीनुसार).जगभरात १५७०० कर्मचारी असलेली एएलडी ऑटोमोटिव्ह | लीजप्लॅन ३.३ मिलियन वाहनांचे व्यवस्थापन करते (मार्च २०२३ च्या अखेरीसच्या आकडेवारीनुसार) युरोनेक्स्ट पॅरिसच्या कम्पार्टमेन्ट एमध्ये ही कंपनी सूचिबद्ध असून, एएलडी ऑटोमोटिव्ह | लीजप्लॅनचे बहुसंख्य शेयर्स सोसायटी जनरलकडे आहेत.
अधिक माहितीसाठी: www.aldautomotive.com




 
 

ई-मेल: [email protected]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here