आपणही कोयना वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवूया
हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी सभागृहात केला उपस्थित
नागपूर दि. २० डिसेंबर – सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जातो आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे अशा शब्दात माजी मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारला ठणकावून सांगितले.
यांना जर मस्ती चढली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही. महाराष्ट्राला वेठीस धरण्याचे काम होत असेल तर ते खपवून घेऊ नका असेही राज्यसरकारला सुनावले. महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर माजी मंत्री जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-विकासकामे-गु/
आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर झालेला हल्ल्याचा मुद्दा सभागृहात जयंत पाटील यांनी उपस्थित केला .काल सीमाभागात मराठी बांधवांचे संमेलन भरवण्यात आले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील एकही नेता पोहोचणार नाही अशी व्यवस्था कर्नाटक सरकारने केली होती. माजी मंत्री हसन मुश्रीफ तेथील मराठी माणसांच्या समर्थनासाठी तिथे पोहोचले असता त्यांच्यावर लाठी उगारली गेली. हे अत्यंत चुकीचे आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
[…] ३१ ऑगस्ट २०२२ ते ०९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत आयोजित स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील विविध भागांतून एकूण ४७९ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांपैकी घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत ३७९, तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ १०० या गटात स्पर्धक सहभागी झाले. घरगुती गणेशोत्सव सजावट गटांत दीपक हजारे (कोल्हापूर) यांना प्रथम पारितोषिक, राजेश परदेशी (अहमदनगर) यांना द्वितीय पारितोषिक, कोमल अग्रवाल (औरंगाबाद) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या गटात पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रत्नागिरी) या मंडळाला प्रथम पारितोषिक, शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ (नाशिक) या मंडळाला द्वितीय पारितोषिक, तर श्री आवडता गणेश मंडळ (नांदेड) या मंडळाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-कर्नाटकच्या-मुख्यमंत… […]