ज्योती रावराणे
गोवा: हिंदूंना पूजनीय असलेल्या गोमातेचे रक्षण व्हावे यासाठी गोवंश हत्याबंदी कायदा राष्ट्रीय स्तरावर व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे हिंदू संघटना आग्रही आहेत. अनेक राज्यांनी राज्यस्तरावर हा कायदा केलेलाही आहे. समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे अकरावे वर्ष असून १६ जूनपासून ते गोव्यात सुरु होत आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-आचार्य-अत्रे-यांच्या/
गोरक्षणासाठी जीवन समर्पित केलेले मान्यवर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. याचा समस्त गोप्रेमींनी आणि हिंदू बांधवांनी लाभ घ्यायला हवा ! या गोरक्षण कायद्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते हे महाराष्ट्रात राजरोसपणे घडणाऱ्या गोहत्यांवरून लक्षात येते. गोरक्षक गोवंशाने भरलेल्या गाड्या पोलिसांना पकडून देतात. अनेकदा हे कसाई आणि गोतस्कर गोरक्षकांवर प्राणघातक हल्ले करतात.
जागतिक स्तरावर गोमाता सर्वांत उपयुक्त प्राणी असल्याचे सिद्ध झाले असताना गायीच्या रक्षणाचे कोणतेच प्रावधान शासनाने आजतागायत केलेले नाही. गोमाता हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. याउलट बीफ व्यवसायात अनेक नेते मंडळींचे आर्थिक हितसंबंध आहेत. देशात अशीच गोहत्या होत राहिली तर उद्या नावालाही गोवंश शिल्लक राहणार नाही. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटितपणे प्रयत्न करत आहेत. हिंदू जनजागृती समिती नामक संघटना यासाठी मागील काही वर्षांपासून कार्यान्वित आहे. समितीच्या वतीने मागील दहा वर्षांपासून राष्ट्रीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे अकरावे वर्ष असून १६ जूनपासून ते गोव्यात सुरु होत आहे.
गोरक्षणासाठी जीवन समर्पित केलेले मान्यवर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. याचा समस्त गोप्रेमींनी आणि हिंदू बांधवांनी लाभ घ्यावा !


