Maharashtra: जनआरोग्य योजनेत आणखी १३१ उपचारांचा समावेश

0
34
महात्मा फुले जनआरोग्य योजना
जनआरोग्य योजनेत आणखी १३१ उपचारांचा समावेश

अभिमन्यू वेंगुर्लेकर

मुंबई- महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पूर्वी उपचारांची संख्या ९९६ होती. या योजनेतील उपचारांची संख्या वाढवून १,३५६ केली आहे. यामध्ये आणखी १३१ आजारांचा समावेश करून ते सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांनाही लागू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, १०८ रुग्णवाहिका चालविणाऱ्या कंत्राटदाराला मुदतवाढ न देता या रुग्णवाहिका आता सरकार स्वतः चालविणार आहे. त्यासंदर्भात सर्व तयारी केली असल्याची माहितीही डॉ. सावंत यांनी दिली. https://sindhudurgsamachar.in/kokan-मराठी-पाऊल-पडते-पुढे-तमि/

जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून ही योजना लागू नसलेल्या तालुक्यांतील १३७ रुग्णालयांत लागू करावी. तसेच योजनेचा गैरवापर करून खासगी रुग्णालये बोगस रुग्ण आणि बोगस बिले दाखवून विमा कंपन्या आणि सरकारची फसवणूक करत आहेत. ते रोखण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी विधान परिषदेतील आमदार सत्यजित तांबे यांनी केली. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी माहिती दिली.

काय म्हणाले आरोग्यमंत्री ?

जनआरोग्य योजनेत आतापर्यंत एक हजार रुग्णालये यादीत

त्यात आणखी ९०० रुग्णलयांचा समावेश

महाराष्ट्रात एकूण १,९०० रुग्णालये या योजनेत समाविष्ट

खासगी रुग्णालयांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी ‘अँटी फ्रॉड ॲप’ आणणार

सर्पदंशावरील उपचारांवरील खर्चाची मर्यादा दीड लाखावरून पाच लाखांपर्यंत

दातांवरील उपचारांचाही या योजनेत समावेश होणार

किडनी विकारांवरील खर्चाच्या मयदितही वाढ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here