Maharashtra: जावा येझदी मोटरसायकलतर्फे दिवाळीसाठी खास मर्यादित कालावधीची योजना जाहीर; आकर्षक ईएमआय आणि विशेष विस्तारित वॉरंटी

0
83
जावा येझदी मोटरसायकलतर्फे दिवाळीसाठी खास मर्यादित कालावधीची योजना जाहीर
जावा येझदी मोटरसायकलतर्फे दिवाळीसाठी खास मर्यादित कालावधीची योजना जाहीर; आकर्षक ईएमआय आणि विशेष विस्तारित वॉरंटी

पुणे, ३१ ऑक्टोबर २०२३: जावा येझदी मोटरसायकलने निश्चितपणे मोटरसायकलप्रेमींचे मन जिंकेल अशी एक मर्यादित कालावधीची योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये १,८८८ रुपयांपासून सुरू होणारे आकर्षक ईएमआय तसेच दिवाळीपर्यंत केलेल्या सर्व डिलिव्हरींवर चार वर्षांची किंवा ५०,००० किमीची विस्तारित वॉरंटी समाविष्ट आहे.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-साऊथचा-सुपरहिट-च/

जावा येझदी मोटारसायकल लाइनअप नेहमीच त्याचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, अतुलनीय कामगिरी आणि काही दशकांपासूनच्या समृद्ध वारशासाठी ओळखली जाते. या विशेष योजनेसह, ब्रँडच्या विस्तारित वॉरंटीद्वारे मनःशांती प्रदान करत या दिग्गज, भारदस्त मोटारसायकलींना व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. जावा मोटरसायकल लाइन-अपमध्ये जावा, जावा 42, जावा 42 बॉबर आणि जावा पेराक यांचा समावेश आहे. येझदी मोटरसायकल लाइन-अपमध्ये – येझदी रोस्टर, येझदी स्क्रॅम्बलर आणि येझदी अॅडव्हेंचर यांचा समावेश आहे.

प्रमुख ठळक मुद्दे:

·         आकर्षक ईएमआय: मोटरसायकलप्रेमी आता फक्त १,८८८ रुपयांच्या ईएमआयसह ऐतिहासिक वारसा असलेल्या गाडीची मालकी घेऊ शकतात. जावा येझदी मोटारसायकलची श्रेणी व्यापक प्रमाणावर रायडर्ससाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही अतुलनीय किंमत ठरविण्यात आली आहे.

·         विस्तारित वॉरंटी: दिवाळीपर्यंत केलेल्या प्रत्येक नोंदणीवर चार वर्षांची विस्तारित वॉरंटी किंवा ५०,००० किमी यापैकी जे आधी येईल त्यांचा समावेश आहे. यातून केवळ ब्रँडचा त्याच्या उत्पादनावरील आत्मविश्वास दिसून येतो असे नाही तर रायडर्स शांत चित्ताने त्यांच्या मोटारसायकलचा आनंद घेऊ शकतील याचीही खात्री मिळते.

·         मर्यादित कालावधी: ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्यामुळे या विलक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी मोटारसायकल प्रेमींना त्वरीत कृती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

·         आयकॉनिक लाइन-अप: जावा येझ्दी मोटरसायकल लाइन-अपमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स असून प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे आकर्षण आणि वैशिष्ट्य आहे. प्रत्येक रायडरच्या शैली आणि आवडीनुसार येथे एक बाइक आहे

·         वारसा आणि जोपासना: जावा आणि येझदी मोटारसायकली अनेक दशकांपासून भारतीय मोटारसायकल संस्कृतीचा एक भाग आहेत. या क्लासिक मशीनपैकी एक आपल्या मालकीची असणे म्हणजे केवळ मोटरसायकल मालकीची असणे नव्हे; तर हे समृद्ध आणि भरीव वारशाचा एक भाग असणे आहे.

जावा येझदी मोटरसायकल ही गुणवत्ता आणि कारागिरीच्या बांधिलकीसाठी ओळखली जाते. प्रत्येक मोटारसायकल आधुनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपला समृद्ध वारसा जतन करण्याच्या ब्रँडच्या समर्पणाची पावती आहे. ही योजना मोटारसायकल प्रेमींसाठी जावा येझदी मोटरसायकल ज्यासाठी ओळखल्या जातात त्या कालातीत आकर्षण आणि कामगिरीचा अनुभव घेण्याची एक अनोखी संधी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here