मुंबई- जुलै महिन्यातील २२ ते २५ या ४ दिवसांत अरबी समुद्राला मोठे उधाण येणार आहे. यावेळी समुद्रात सुमारे ४.५९ ते ४.७२ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत .राज्यात हवेचा दाब अनुकूल आज झाल्याने आज शुक्रवार (५ जुलै) पासून मान्सून जोर धरणार आहे. ५ ते १० जुलैदरम्यान संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार, तर कोकणात ७ व ८ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-अमलीपदार्थ-विरोची-सप्ता/
देशाच्या कानाकोपऱ्यात मान्सून २ जुलै रोजी पोहोचल्याने तो लवकरच हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर होत आहे. त्यामुळे पावसाचा जोर देशभर वाढणार आहे. महाराष्ट्रातही हवेचे दाब ९४२ ते १००२ हेक्टा पास्कल इतके अनुकूल झाल्याने राज्यात मान्सूनच्या वाऱ्यांनी जोर धरला आहे. दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा किनारपट्टीवर तयार झाल्याने केरळ ते महाराष्ट्र किनारपट्टीवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
.‘या’ दिवशी असणार भरती
सोमवार २२ जुलै दुपारी १२.५० वाजता ४.५९ मीटर मंगळवार २३ जुलै दुपारी १.२९ वाजता ४.६९ मीटर बुधवार २४ जुलै दुपारी २.११ वाजता ४.७२ मीटर गुरुवार २५ जुलै दुपारी २.५१ वाजता ४.६४ मीटर