Maharashtra: जेएसडब्ल्यू वन कंपनीचे आता सिमेंट निर्मिती क्षेत्रात पुढाकार!

0
13
जेएसडब्ल्यू वन कंपनी,
जेएसडब्ल्यू वन कंपनीचे आता सिमेंट निर्मिती क्षेत्रात पुढाकार!

बांधकाम क्षेत्रात ‘जेएसडब्ल्यू वन काँक्रीट’ या रेडी टू मिक्स सिमेंट निर्मितीसह दर्जात्मक, सर्व सोईसुविधांसह वेळेवर उत्पादन उपलब्ध करून देण्याची हमी

मुंबई, 

जेएसडब्ल्यू ग्रुप या प्रसिद्ध कंपनीचा भाग असलेल्या जेएसडब्ल्यू वन या बीएसटूबी ई-कॉमर्सने आता सिमेंट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ‘जेएसडब्ल्यू वन काँक्रीट’ सिमेंट हे ‘रेडी टू मिक्स’ म्हणजेच उत्पादन उपलब्ध होता, क्षणीच तत्काळ वापरासाठी वापरता येईल. बांधकाम क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेत, ‘जेएसडब्ल्यू वन काँक्रीट’ सिमेंटची निर्मिती करण्यात आली. या नव्या उत्पादनाच्या निर्मितीने जेएसडब्ल्यू वन हा ब्रँड अजूनच सक्षम झाला आहे. मागणीनुसार सातत्याने उपलब्ध असणाऱ्या उत्तम दर्जाच्या सिमेंटची निर्मिती जेएसडब्ल्यू वनकडून केली जाईल. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

सध्या जेएसडब्ल्यू वन काँक्रीट मुंबई व नजीकच्या भागात उपलब्ध असेल. येत्या तीन वर्षांत जेएसडब्ल्यू वन काँक्रीट हे रेडी टू मिक्स सिमेंटची मागणी असलेल्या २० प्रमुख शहरात उपलब्ध होईल. या २० शहरांत देशातील ५० % रेडी टू मिक्स सिमेंटची बाजारपेठ आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रुईया-आणि-एस्सार-कुटुंब/

कंत्राटदार, बिल्डर, डेव्हलपर्स, आर्किटेक्ट, स्ट्रक्चरल इंजिनीअर आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांच्यासाठी डिझाइन केलेले हे उत्पादन देशभरात टप्प्याटप्प्याने उपलब्ध होईल. 

जेएसडब्ल्यू वन प्लॅटफॉर्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव सचदेवा म्हणाले, “आपल्या देशातील वाढता बांधकाम उद्योग, शहरीकरणाचा वाढता विस्तार, पायाभूत सुविधा प्रकल्पांची बांधणी, तसेच सरकारच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पामुळे भारतात काँक्रीटची मागणी झपाट्याने वाढत आहे.

देशातील बी२बी उद्योगात आमची वाढलेली मागणी, तसेच आमच्या उत्तम दर्जाच्या, विश्वासार्हता आणि वेळेवर उत्पादन देण्याच्या क्षमतेमुळे आमचे जेएसडब्ल्यू वन काँक्रीट हे आमच्या सेवा वैशिष्ट्यांना साजेसे उत्पादन ठरते. जेएसडब्ल्यू वन काँक्रीट औद्योगिक आणि बांधकाम साहित्यासाठी सर्वसमावेशक, मूल्य-आधारित प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या आमच्या दृष्टिकोनाचे समर्थन करते.”

जेएसडब्ल्यू वन काँक्रीट गुणवत्ता आणि वेळेवर पूर्ण (ओटीआयएफ) सेवा वितरणाबाबत कटिबद्ध आहे. जेएसडब्ल्यू वन काँक्रीटच्या वापरामुळे कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक गुणवत्तेबाबत तडजोड न करता दिलेल्या मुदतीत बांधकाम पूर्ण करू शकतात. 

जेएसडब्ल्यू समूहात अगोदरपासून उपलब्ध असलेल्या सर्व सोईसुविधांमुळे हे सिमेंट उत्पादन जीजीबिएस आणि योग्य रासायनिक मिश्रणामुळे विश्वासार्ह आहे, शिवाय या वैशिष्ट्यांमुळे बाजारात नव्या उत्पादनाची सातत्यता दिसून येईल. परिणामी, गेल्या काही काळात उद्योग व्यवसायातील उत्पादनाच्या दर्जातील गमावलेली विश्वसनीयता परत येईल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here