महाराष्ट्र, ऑक्टोबर ०८-२०२४ – टीव्हेस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या दुचाकी व तीन चाकी वाहन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने आज टीव्ही रेडिऑनची नवी ब्लॅक एडिशन लाँच केली. या नव्या एडिशनमुळे टीव्हीएस रेडिऑनच्या श्रेणीत तीन वैशिष्ट्यपूर्ण व्हेरिएंट्सचा समावेश झाला असून त्यामुळे वैविध्यपूर्ण ग्राहकांना सेवा देणे शक्य होईल.https://sindhudurgsamachar.in/kokan-मागेल-त्याला-सौर-कृषिपंप/
टीव्हीएस रेडिऑनच्या नव्या ब्लॅक एडिशनला असामान्य मायलेज व दर्जेदार कामगिरीसाठी प्रचलित असलेले ११० सीसी ईटीएफआय इंजिन बसवण्यात आले आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक सेल्फ- स्टार्ट यंत्रणा, जास्त आरामदायीपणा लांब- कुशनची सीट आणि युएसबी चार्जरची तरतूद यांचा समावेश करण्यात आला असून दैनंदिन गरजांसाठी ती योग्य आहे.
ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्याच्या टीव्हीएस मोटरच्या बांधिलकीशी सुसंगत राहात नवीन टीव्हीएस रेडिऑन ब्लॅक एडिशनची किंमत रू. ७०,९८३ (एक्स शोरूम महाराष्ट्र ) ठेवण्यात आली आहे. ताकद आणि अभिजातता यांचे प्रतीक असलेल्या काळ्या रंगाचे रायडर्सना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे.
टीव्हीएस रेडिऑनची प्रमुख वैशिष्ट्ये
• शक्तीशाली ११० सीसी ईटीएफआय इंजिन – टीव्हीएस रेडिऑनमध्ये कामगिरीबाबत तडजोड न करता दमदार व प्रभावी मायलेज देणारे ११० सीसी ईटीएफआय इंजिन देण्यात आले आहे.
• इलेक्ट्रिक सेल्फ- स्टार्ट – सोयीस्कर, विश्वासार्ह इलेक्ट्रिक सेल्फ- स्टार्टमुळे पटकन इग्निशन होते आणि रायडिंगचा एकंदर अनुभव उंचावतो.
• आरामदायी व सोयीस्कर – या मोटरसायकलमध्ये लांब, कुशनची सीट, युएसही चार्जरसाठी तरतूद करण्यात आल्यामुळे रोजचा प्रवास करणारे तसेच लांबच्या पल्ल्याचा प्रवास करणारे रायडर्स यांची सोय होते.
• आधुनिक तंत्रज्ञान – टीव्हीएस रेडिऑनमध्ये क्रोम बेझल हेडलॅम्प डेटाइम रनिंग लॅम्प (डीआरएल), रिव्हर्स लसीडी क्लस्टर – रियल टाइम मायलेज इंडिकेटरसह आणि ऑल- गियर इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टीम देण्यात आली असल्यामुळे रायडर्सना आधुनिक तंत्रज्ञान आणि इतर युजर- फ्रेंडली वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.
• स्थैर्य आणि सुरक्षितता – १८ इंची व्हील्समुळे टीव्हीएस रेडिऑनचा प्रवास वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर स्थिर आणि आरामदायीपणे होतो.
आकर्षक ब्लॅक फिनिशसह टीव्हीएस रेडिऑन विविध व्हेरिएंट्समध्ये आकर्षक रंग उपलब्ध करण्यात आले असून त्यात मेटल ब्लॅक, स्टारलाइट ब्लू, रॉयल पर्पल आणि डिजी एडिशनमध्ये ड्युएल टोन यांचा समावेश आहे. टीव्हीएस रेडिऑन टिकाऊपणा व विश्वासार्हतेसाठी ओळखली जात असून या गाडीने नुकतेच जेडी पॉवर आयक्यूएस २०२४ अपील स्टडीमध्ये आघाडीचे स्थान मिळवत कम्युटर सेगमेंटमधील सर्वाधिक पसंतीच्या गाडीचे स्थान आणखी मजबूत केले.
टीव्हीएस रेडिऑनचे नवे व्हेरिएंट भारतातील सर्व अधिकृत टीव्हीएस मोटर कंपनीच्या वितरकांकडे उपलब्ध आहे.