पुण्यातील टॉर्कच्या एक्सपिरीयन्स सेंटर मधून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वितरण झाले
पुणे, २७ मार्च: भारतातील पहिली इलेक्ट्रिक मोटारसायकल उत्पादक टॉर्क मोटर्सने आज मराठी नववर्षाच्या निमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ५० टॉर्क क्राटोस आर मोटरसायकली वितरित केल्या. पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावरील टॉर्क मोटर्सच्या डीलरशिपमधून यशस्वीरित्या हे वितरण झाले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राहुल-गांधींची-तडकाफडक/
याबद्दल बोलताना टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कपिल शेळके म्हणाले, “या शुभ दिवशी, ई-मोटारसायकल प्रेमींना त्यांच्या टॉर्क क्राटोस आर च्या किल्ल्या देऊन त्यांच्या उत्सवात रंग भरताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला मिळणा-या प्रतिसादामुळे आम्ही भारावून गेलो आहोत आणि टॉर्क मोटर्सच्या कुटुंबात अधिकाधिक रायडर्स जोडण्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना आणि हितचिंतकांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो.”
कंपनीने नुकतेच पुण्यात आपले पहिले-वहिले एक्सपिरीयन्स सेंटर (COCO मॉडेल) सुरू केले आहे आणि या आर्थिक वर्षाच्या अखेरीस अग्रणी टियर श्रेणीतील शहरांमध्ये आपला ठसा आणखी मजबूत करण्याचा विचार करत आहे. www.booking.torkmotors.com वर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ग्राहक क्राटोस आणि क्राटोस आर ची नोंदणी करू शकतात.


