Maharashtra: टोमॅटो विकून पुण्यातील शेतकरी एका महिन्यात झाला करोडपती

0
123
टोमॅटो
टोमॅटो विकून पुण्यातील शेतकरी एका महिन्यात झाला करोडपती

पुणे- सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने टोमॅटोची लागवड करून लाखो रुपये कमावले आहेत. तुकाराम भागोजी गायकर आणि त्यांच्या कुटुंबाने एका महिन्यात 13,000 टोमॅटो क्रेट विकून 1.5 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तुकाराम यांच्याकडे 18 एकर शेतजमीन असून 12 एकर जमिनीवर त्यांनी त्यांचा मुलगा ईश्वर गायकर आणि सून सोनाली यांच्या मदतीने टोमॅटोची लागवड केली आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-व्हिजन-ग्रुप-व-ग्रामपंचा/

गायकर कुटुंबाने सांगितले की, ते चांगल्या दर्जाचे टोमॅटो पिकवतात. टोमॅटो शेतीचं त्यांना ज्ञान आहे. नारायणगंजमध्ये टोमॅटोचा एक क्रेट विकून शेतकऱ्याने एका दिवसात 2,100 रुपये कमवले. गायकर यांनी शुक्रवारी एकूण 900 क्रेट विकून एकाच दिवसात 18 लाख रुपयांची कमाई केली. गेल्या महिन्यात, त्यांनी गुणवत्तेच्या आधारावर टोमॅटोचे क्रेट 1,000 ते 2,400 रुपये प्रति क्रेट दराने विकले. पुणे जिल्ह्यातील जुन्नर या शहरात टोमॅटो पिकवणारे अनेक शेतकरी आता करोडपती झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here