कोल्हापूर: प्रजासत्ताक दिनाचे औचित्याने महावितरणच्या कागल उपविभागीय कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी “थ्री अर्थिग रॉड जिंदगी के” विद्युत सुरक्षा मार्गदर्शन कार्यशाळा व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर यांचे मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. सुरक्षा कार्यशाळेत कार्यकारी अभियंता श्री. दत्तात्रय भणगे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.संजय शिंदे, उपविभागीय अभियंता श्री. विनोद घोलप, सहाय्यक अभियंता श्री. विवेक लाटकर यांनी जनमित्रांना मार्गदर्शन केले. https://sindhudurgsamachar.in/kokan-महाराष्ट्र-राज्य-मागासव/
इचलकरंजी विभागात आरोग्य शिबिर
महावितरणच्या इचलकरंजी विभागीय कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी व त्यांचे कुटुंबीयांकरिता आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.या शिबिराचा १३० जणांनी लाभ घेतला.ॲस्टर आधार हॉस्पिटल, कोल्हापूर यांचे मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली. हृदय विकारतज्ञ डॉ.लोकेश चौधरी हृदयाचे आजार व घ्यावयाची काळजी या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले. या शिबिरासाठी डॉ.अजिंक्य दोरकर, समन्वयक श्री.आशिष काटे यांच्यासह सहकारी वृंदाचे सहकार्य लाभले. यावेळी कार्यकारी अभियंता श्री.प्रशांत राठी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री.कदम,उपकार्यकारी अभियंता श्री.सुनिल अकिवाटे, उपव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री.सुहास वडणगेेकर यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.