Maharashtra: नारळी पौर्णिमादिनी ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येणार

0
39
‘शेतकरी दिन’,
नारळी पौर्णिमादिनी ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येणार

मुंबई : यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पौर्णिमादिनी राज्यात ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येणार आहे.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येईल. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाने निर्गमित करण्यात येणार आहेत. या दिवशी वेबिनार संवाद / मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here