Maharashtra: निवडणुकीच्या कामाला जे शिक्षक दांडी मारतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार

0
44
निवडणुक,शिक्षक ,
निवडणुकीच्या कामाला जे शिक्षक दांडी मारतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार

मुंबई- विनाअनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात येणार असून त्यातून सुटका मिळावी, अशी मागणी करत शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र आज गुरुवारपासून (ता. ११) सुरू होणाऱ्या निवडणुकीच्या कामाला जे शिक्षक दांडी मारतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तशी माहिती निवडणूक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयात दिली. दरम्यान शिक्षकांनी निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार सहकार्य करावे. त्याची माहिती द्यावी, असे निर्देश विविध शिक्षक संघटनांना दिले. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिक्षण-मंत्री-दीपक-केसरक/

विनाअनुदानित इंग्रजी शाळेतील शिक्षकांना निवडणुकीचे काम लावल्याने अनएडेड स्कूल फोरम, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन, प्रायव्हेट अनएडेड स्कूल असोसिएशन आणि इंटरनॅशनल स्कूल असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्या. ए. एस. चांदुरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना ॲड. मिहीर देसाई यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिकवण्याचे मुख्य काम सोडून शिक्षकांना निवडणुकीच्या कामाला जुंपले जात आहे. त्या वेळी निवडणूक आयोगाच्यावतीने ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोनी, ॲड. अक्षय शिंदे आणि ॲड. प्रदीप राजगोपाल यांनी माहिती देताना खंडपीठाला सांगितले की, गुरुवारपासून ट्रेनिंग कॅम्प सुरू होणार असून या ट्रेनिंग कॅम्पला अनुपस्थित राहणाऱ्या शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत निवडणूक आयोगाच्या विनंतीनुसार शिक्षकांना सहकार्य करण्यास सांगितले व या प्रकरणावरील सुनावणी १५ एप्रिलपर्यंत तहकूब केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here