Maharashtra: निवडणूक निकालानंतरच तलाठी भरती

0
63
मंत्रिमंडळच्या गुरूवार, दि. 10 ऑक्टोबर 2024 बैठकीत घेण्यात आलेले एकूण सोळा निर्णय
मंत्रिमंडळच्या गुरूवार, दि. 10 ऑक्टोबर 2024 बैठकीत घेण्यात आलेले एकूण सोळा निर्णय

तलाठी भरती प्रक्रियेतील अनेक टप्पे पार पाडल्यानंतर उमेदवारांना आता आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून अद्याप परवानगी मिळाली नसून, त्याला आचारसंहितेचा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे जूनमध्ये निवडणुकींचा निकाल लागल्यानंतरच तलाठी भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात तलाठी भरती प्रक्रियेसाठी गेल्या वर्षी जूनपासून सुरुवात करण्यात आली होती. चार हजार ६८८ जागांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. यासाठी १० लाख ४१ हजार ७१३ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर भूमी अभिलेख विभागाने त्यात सुधारणा केल्या. त्यानंतर यंदाच्या मार्चमध्ये या परीक्षेची अंतिम गुणवत्ता तसेच निवड यादी जाहीर केली आहे.आदिवासी बहुल क्षेत्रांतंर्गत (पैसा) १३ जिल्ह्यांमध्ये निवड प्रक्रिया न्यायप्रविष्ट असल्याने थांबविण्यात आली होती. त्या वगळता अन्य गावांमधील ५७४ पदांची निवड प्रक्रिया स्थगित करून अन्य एक हजार ७१८ पदांसह सर्व ३६ जिल्ह्यांमधील चार हजार २१९ पदांसाठी सुधारीत गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-निवडणूक-काळात-रात्री-१०/

कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उमेदवारांना प्राधान्य नियुक्तीचा प्राधान्यक्रम देण्यात आला होता. त्याच दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. तलाठी पदाच्या नियुक्तीबाबत काय करायचे यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे विचारणा केली. आचारसंहितेमुळे राज्य सरकारला कोणताही निर्णय घेता येत नाही अथवा नियुक्ती देता येत नाही. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू झाली असल्याने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. या नियुक्तीला मान्यता देणार देता येणार नसल्याचे आयोगातील सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या उमेदवारांना जूनमध्ये आचारसंहिता संपल्यानंतर नियुक्ती मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here