Maharashtra: पहिल्या L&T नॅशनल STEM चॅलेंज मध्ये दिसून आली युवा प्रतिभा

0
86
L&T नॅशनल STEM चॅलेंज
पहिल्या L&T नॅशनल STEM चॅलेंज मध्ये दिसून आली युवा प्रतिभा

या कार्यक्रमाला मेगा इव्हेंट बनवत ६००० विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातील स्पर्धांमध्ये घेतला भाग

मुंबई: पहिल्या L&T राष्ट्रीय STEM चॅलेंजमध्ये गेरुगम्बक्कम, चेन्नईच्या गव्हरमेंट हायस्कूलला राष्ट्रीय विजेतेपद मिळाले. मुंबईत ३ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  हा कार्यक्रम म्हणजे शालेय मुलांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) या विषयांबद्दल रुची निर्माण व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी L&T ने भारतातील सहा शहरांमध्ये आयोजित केलेल्या प्रादेशिक स्तरावरील STEM फेस्टचा परिपाक आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-रखडलेली-घरबांधणी-आणि-गिर/

आपल्या सीएसआर कार्याचा एक भाग म्हणून, L&T ने विक्रम ए साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर (VASCSC) च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला. L&T नॅशनल STEM चॅलेंज ३ फेब्रुवारी रोजी पवई येथील AMN टॉवर येथे आयोजित करण्यात आले होते. L&T च्या ‘इंजिनियरिंग फ्युचर्स’ उपक्रमाद्वारे STEM शिक्षणाला चालना देण्याचे महत्वपूर्ण काम झाले. भारतभरातील तरुण मनाची अतुलनीय प्रतिभा आणि नाविन्यपूर्णता या कार्यक्रमातून दिसून आली. तीव्र स्पर्धेच्या तीन फेऱ्यांनंतर गव्हर्नमेंट हायस्कूल गेरुगंबक्कम राष्ट्रीय विजेते म्हणून उदयास आले तर गव्हर्नमेंट हायस्कूल,  वेलाप्पनचावुडी (चेन्नई) आणि श्री कांचनलाल मामावाला सुरत म्युनसीपल कॉर्पोरेशन स्कूल (हजिरा, गुजरात) यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय उपविजेतेपद मिळाले. कालियान्ननपुधुर, कोईम्बतूरच्या गव्हर्नमेंट उच्च माध्यमिक विद्यालयाने परीक्षकांचे विशेष पारितोषिक पटकावले.

इयत्ता ६ वी – ८ वी च्या सुमारे ६,००० विद्यार्थ्यांनी आंतरशालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्यापैकी ऑक्टोबर 2023 पासून आयोजित प्रादेशिक स्तरावरील STEM फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी २०८ संघ (४१६ मुले) निवडले गेले. त्यापैकी चेन्नई, कोईमतूर, हजीरा, वडोदरा, तळेगाव आणि मुंबई येथील २४ संघांनी (५० मुले) L&T राष्ट्रीय STEM चॅलेंज स्पर्धेत प्रवेश मिळविला.

चार विजेत्या शाळांना आगाऊ रोख बक्षीस मिळाले – आपल्या विज्ञान प्रयोगशाळांमध्ये सुधारणा केल्याबद्दल राष्ट्रीय विजेत्यांसाठी 50,000 रुपये, प्रथम उपविजेतेपदासाठी 30,000 रुपये आणि द्वितीय उपविजेतेपद तसेच ज्युरी विशेष विजेते यांना प्रत्येकी 20,000 रुपये बक्षीस मिळाले. याशिवाय, सर्व चार विजेत्या संघांना STEM च्या पुढील कामगिरीसाठी टेलिस्कोप, ड्रोन आणि DIY रोबोटिक्स किट्ससह बक्षिसे आणि L&T च्या तंत्रज्ञान प्रकल्पांना भेट देण्याची तसेच नेतृत्व संघाशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

L&T चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. एस एन सुब्रह्मण्यन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. “पहिल्या L&T नॅशनल STEM चॅलेंजमध्ये सहभागी तरुण नवनिर्मात्यांनी दाखवलेल्या विलक्षण प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा साक्षीदार होणे हा सन्मान आहे. STEM शिक्षण आपल्या मुलांचे भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि दर्जेदार शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी त्याचा विस्तार करण्याबाबत असलेली आमची बांधिलकी यासारख्या उपक्रमातून दिसून येते. कोणतीही पार्श्वभूमी असली तरी सर्व विद्यार्थ्याना STEM च्या विलक्षण जगात स्वतःला सामावण्याची संधी मिळेल हे सुनिश्चित केले जाते,” असे ते म्हणाले.

स्पर्धेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत L&T नॅशनल STEM चॅलेंज स्पर्धा तीन रोमांचक पातळीवर झाली.

पहिल्या पातळीवर, विद्यार्थ्यांनी आंतर-शालेय STEM मॉडेल-मेकिंग स्पर्धेत त्यांचे कौशल्य दाखविले. हरित  आणि शाश्वत ऊर्जा, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट शाळा आणि उपग्रह आणि प्रक्षेपण वाहने यासारख्या नाविन्यपूर्ण संकल्पना यात सादर झाल्या. प्रत्येक शाळेतील अतुलनीय कामगिरी करणारे संघ द्वितीय पातळीवर गेले. ही पातळी म्हणजे प्रादेशिक आंतरशालेय STEM फेस्ट आणि स्पर्धा. या टप्प्यात विज्ञान कला, विज्ञान प्रश्नमंजुषा, विज्ञान वक्तृत्व आणि डिझाइन चॅलेंज यासारख्या विविध प्रकारच्या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

एल अँड टी स्वयंसेवकांनी संपूर्ण प्रादेशिक आणि राष्ट्रीय टप्प्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्पर्धेसाठी  STEM मॉडेल्स तयार करण्यात विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत यात सक्रिय सहभाग घेतला. या सहभागामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पनांचे सखोल आकलन व्हायला चालना मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here