Maharashtra: पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची केली फसवणूक -अमरसेन सावंत

0
43
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची केली फसवणूक
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची केली फसवणूक -अमरसेन सावंत

⭐गतवर्षी उदघाटन केलेल्या अणाव घाटचेपेड पुलाचे काम अजूनही अपूर्णच;पुलावर कार्पेट,एक्सपेन्शन *पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची केली फसवणूक -अमरसेन सावंत ⭐गतवर्षी उदघाटन केलेल्या अणाव घाटचेपेड पुलाचे काम अजूनही अपूर्णच ⭐पुलावर कार्पेट,एक्सपेन्शन जॉईंट,जोडरस्त्याचे काम केले नसल्याने पुलावरून वाहतूक आहे बंद

महाविकास आघाडीच्या काळात खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. ०९ मार्च २०१९ रोजी या कामाची वर्क ऑर्डर झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज रोजी पर्यंत या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे.त्यामध्ये पुलावरून वाहतूक करण्यासाठी जोडरस्ते करण्यात आलेले नाहीत, पुलाच्या स्लॅबवर कार्पेट केलेले नाही. पुलाचे एक्सपेन्शन जॉईंट बसविलेले नाहीत. तरी देखील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गतवर्षी ४ सप्टेंबर २०२३ रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचेपेड पुलाचे शासकीय उदघाटन केले. आता पुलाचे उदघाटन होऊन ८ महिने झाले तरी देखील पुलाचे उर्वरित काम व जोडरस्ते करण्यात आलेले नाहीत त्यामुळे शासनाने या पुलावरून अधिकृत वाहतूक करण्यास परवानगी दिलेली नाही. पालकमंत्र्यांनी निवडणुकीत मते मिळविण्याच्या उद्देशाने घाईघाईत पुलाचे उदघाटन करून श्रेय घेतले.मात्र रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणतीही तत्परता दाखविली नाही. आता पावसाळा सुरु होणार असल्याने पुरस्थितीत उद्भवल्यास नागरिकांना या अर्धवट स्थितीतील पुलाचा कोणताच फायदा होणार नाही. अर्धवट असलेल्या पुलाचे उदघाटन करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची फसवणूक केली आहे. पुलाच्या उद्घाटनाला जशी घाई करण्यात आली तशीच घाई जर काम पूर्ण करण्यासाठी केली असती तर पावसाळ्यात अणाव व कुडाळ येथील नागरिकांना पुलाचा फायदा झाला असता अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.जॉईंट,जोडरस्त्याचे काम केले नसल्याने पुलावरून वाहतूक बंद आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-गडचिरोलीत-पोलिसांची-मो/

महाविकास आघाडीच्या काळात खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी अणाव घाटचेपेड पुल मंजूर करून त्यासाठी २ कोटी ६५ लाख रु मंजूर केले होते. ०९ मार्च २०१९ रोजी या कामाची वर्क ऑर्डर झाली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आज रोजी पर्यंत या पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे.त्यामध्ये पुलावरून वाहतूक करण्यासाठी जोडरस्ते करण्यात आलेले नाहीत, पुलाच्या स्लॅबवर कार्पेट केलेले नाही. पुलाचे एक्सपेन्शन जॉईंट बसविलेले नाहीत. तरी देखील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गतवर्षी ४ सप्टेंबर २०२३ रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव घाटचेपेड पुलाचे शासकीय उदघाटन केले. आता पुलाचे उदघाटन होऊन ८ महिने झाले तरी देखील पुलाचे उर्वरित काम व जोडरस्ते करण्यात आलेले नाहीत त्यामुळे शासनाने या पुलावरून अधिकृत वाहतूक करण्यास परवानगी दिलेली नाही. पालकमंत्र्यांनी निवडणुकीत मते मिळविण्याच्या उद्देशाने घाईघाईत पुलाचे उदघाटन करून श्रेय घेतले.मात्र रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी कोणतीही तत्परता दाखविली नाही. आता पावसाळा सुरु होणार असल्याने पुरस्थितीत उद्भवल्यास नागरिकांना या अर्धवट स्थितीतील पुलाचा कोणताच फायदा होणार नाही. अर्धवट असलेल्या पुलाचे उदघाटन करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अणाव व कुडाळ तालुक्यातील नागरिकांची फसवणूक केली आहे. पुलाच्या उद्घाटनाला जशी घाई करण्यात आली तशीच घाई जर काम पूर्ण करण्यासाठी केली असती तर पावसाळ्यात अणाव व कुडाळ येथील नागरिकांना पुलाचा फायदा झाला असता अशी टीका शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here