Maharashtra: पुणे मुंबई शिवनेरी प्रवासादरम्यान सहप्रवाश्याने कॉफीमध्ये गुंगीचे औषध देऊन सोने आणि पैसे लुटले

0
46
रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले
रेल्वे सिग्नलमध्ये बिघाड करून‎ महिलांचे दागिने लुटले

एसटी कर्मचाऱ्यांनी नशेत समजून फुटपाथवर सोडले

मुंबई- शिवनेरी बसमधून मुंबईला जाणाऱ्या पुण्यातील 57 वर्षीय व्यक्तीला 14 जून रोजी सहप्रवाशाने अंमली पदार्थ पाजून लुटल्याचा आरोप केला आहे. ते बेशुद्ध अवस्थेत असताना दादर शिवनेरीच्या कर्मचाऱ्यांनी बसमधून त्यांना हाकलून दिल्याचा दावाही या दरम्यान त्यांनी केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पोलीस-भरती-चाचणीदरम्या/

पोलिस तक्रारीनुसार, पीडितेच्या शेजारी बसलेल्या प्रवाशाने आधी त्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर खालापूर फूड मॉलमध्ये त्याला कॉफीचा कप देऊ केला. पेय सेवन केल्यानंतर काही वेळातच पीडितेला गुंगी आली. यावेळी प्रवाशाला कोणीतरी अज्ञात पदार्थाचे इंजेक्शन दिल्याचाही संशय आहे. प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, 15 जून रोजी त्याला जाग आली आणि त्यावेळी ते ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये होते.

गुंगीत असणारा प्रवासी मुंबईला ‘शिवनेरी’ने पोहोचला तेव्हा शिवनेरी स्टँडवरील कर्मचाऱ्यांनी हा माणूस नशेत असावा, म्हणून त्याला रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फुटपाथवर सोडून दिले. तब्बल 18 तास हा माणूस फुटपाथवर बेवारस अवस्थेत पडून राहिला. त्यांचे कपडे, राहणीमान बघूनही कोणाला विचारपूस करावी वाटली नाही. शोधत आलेल्या नातेवाइकांनी त्यांना ओळखून रुग्णालयात नेले. त्यानंतर 80 तासाने सदर व्यक्ती शुद्धीवर आली. शैलेंद्र साठे असे त्यांचे नाव आहे.

शैलेंद्र साठे हे पुण्यात पत्नी आणि मुलांसोबत राहतात. ते दुबईतून पुण्यात स्थायिक झाले आहेत. 14 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता वाकड येथून त्यांनी मुंबईसाठी शिवनेरी बस पकडली. प्रवासादरम्यान शेजारी बसलेल्या अनोळखी प्रवाशाने संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दुपारी दोनच्या सुमारास बस पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील खालापूर येथील फूडमॉलकडे थांबली. साठे खाली उतरले. आइस्क्रीम खाऊन पुन्हा बसमध्ये चढणार तोच सहप्रवासी कॉफी घेऊन त्यांच्या पुढ्यात आला. त्यांनी कोणतीही शंका न घेता ती कॉफी घेतली व बसमध्ये त्यांना गुंगी आली. दरम्यान, सहप्रवाशाने एकूण 53 ग्रॅम दागिने, मोबाइल, महागडे घड्याळ आणि किमती ऐवज लुटला व पसार झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here