पुणे/🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार
बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचार्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर आता तसाच प्रकार पुण्यातील वानवडी भागात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका शाळेतील मुलींना चालत्या स्कूल व्हॅनमध्ये त्रास दिल्याचं समोर आलं आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-रेल्वे-कर्मचाऱ्यांना-क/
एका पीडीत मुलीने प्रायव्हेट पार्ट मध्ये जळजळ होत असल्याची तक्रार आईकडे केल्यानंतर हा प्रकार प्रकाश झोकात आला आहे. त्यानंतर पालकांनी दुसर्या मुलीच्या पालकांनाही या प्रकाराची माहिती दिली. वानवडी पोलिसांकडून मुलींवर बस मध्ये होत असलेल्या लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून घेतला आहे. यामध्ये बस चालकाने 6 वर्षीय मुलगी आणि तिची मैत्रिण बसमध्ये बसल्या असताना त्यांच्या प्रायव्हेट पार्ट्सला हात लावल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 4 दिवस रोज सुरू असल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
बस चालक मुलींच्या जवळ बसून त्यांना त्रास देत होता. तसेच याबाबत धमकावल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान मुलींनी घरी गेल्यानंतर त्यांना त्रास होत असल्याची तक्रार केल्यावर आईने अधिक विचारणा केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये आरोपी संजय जेटींग रेड्डी ( 45, वैदूवाडी, हडपसर) या स्कूल व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच पोक्सो अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने स्कुल व्हॅनची तोडफोड केली आहे.
या आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केलं, यावेळी हा आरोपी न्यायाधीशांसमोरच ढसाढसा रडला असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं. त्यावेळी हा आरोपी न्यायाधीशांसमोर जोरजोरात रडू लागला.
.