मुबंई- वस्तुंच्या पाकिटावर प्रत्यक्ष वस्तू उत्पादनाचा किंवा आवेष्टित केल्याचा किंवा आयात केल्याचा महिना, वर्ष छापण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे बहुतांश प्रकरणांत या बाबी छापल्या जात नसत. त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष केव्हा उत्पादित केली आहे किंवा किती जुनी आहे, हे ग्राहकांना समजत नव्हते. याची दखल घेत एमआरपी किमतीशिवाय आवेष्टीत वस्तुंवर प्रतियुनिट किंमत छापणेही नव्या वर्षात बंधनकारक केले आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्गातील-सह्याद्/
आवेष्टित (पॅकेज्ड गूड्स) वस्तुंच्या उत्पादक आणि आयातदारांना उत्पादनाचा महिना आणि वर्ष छापणे केंद्र सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वस्तू केव्हा उत्पादित केली आहे, किती जुनी आहे हे समजणार आहे. याशिवाय कमाल किमतीशिवाय (एमआरपी) आवेष्टित वस्तुंवर प्रतियुनिट किंमत छापणेही बंधनकारक केले आहे.
दूध, चहा, बिस्किटे, खाद्यतेले, पिठ, पेये, पेयजल, बालान्न, डाळी, कडधान्ये, ब्रेड, डिटर्जेंट, सिमेंट यांसारख्या १९ वस्तु यापूर्वी विशिष्ट वजनातच म्हणजेच ५०, ७५, १००, १५० ग्रॅम किंवा ठराविक किलो वा लिटरमध्येच विकणे बंधनकारक होते. त्यामुळे आतापर्यंत बाजारात वरीलप्रमाणे दोन, तीन ठराविक वजनाचेच ब्रेड, टूथपेस्ट, साबण, पेयजलाच्या बाटल्या बघायला मिळायच्या. आता नवीन वर्षापासून उत्पादनांवरील हे बंधन काढून टाकण्यात आले आहे आणि त्यामुळे आता हेच ब्रेड, टूथपेस्ट, साबण ५०, ६०, ७०, ७५, ८० ग्रॅम अशा कोणत्याही वजनात बाजारात येऊ शकतील.एखादी ५०० ग्रॅम वजनाची वस्तू विकायची असल्यास त्याच्या एमआरपी किमतीबरोबरच त्याची प्रतिग्रॅम किंमत छापणेही आता बंधनकारक करण्यात आले आहे.