Maharashtra: प्रगत मॉड्यूलर मल्टीफेज हब मोटर तंत्रज्ञानासाठी स्लोव्हेनिया स्थित जीईएम मोटर्स बरोबर भागीदारी

0
21
गत मॉड्यूलर मल्टीफेज हब मोटर तंत्रज्ञानासाठी स्लोव्हेनिया स्थित जीईएम मोटर्स बरोबर भागीदारी

फ्लॅशने बळकट केले आपले जागतिक ईव्ही सामर्थ्य, प्रगत मॉड्यूलर मल्टीफेज हब मोटर तंत्रज्ञानासाठी स्लोव्हेनिया स्थित जीईएम मोटर्स बरोबर भागीदारी

पुणे, ९ फेब्रुवारी २०२३: आघाडीच्या तंत्रज्ञान पुरवठादार आणि इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादकांपैकी एक फ्लॅशने जीईएम मोटर्ससह नवीन तांत्रिक सहकार्य करत आपली इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही] क्षमता आणि पोर्टफोलिओ मजबूत केला. इलेक्ट्रिक वाहनांसाठी हाय-टेक इलेक्ट्रिक मोटर्स  विकसीत करण्यात विशेष प्राविण्य असलेल्या आघाडीच्या युरोपियन नाविन्यपूर्ण कंपन्यांपैकी जीईएम मोटर्स एक आहे. या नवीन भागीदारी अंतर्गत, दोन्ही ब्रँड 1 kW ते 15 kW च्या श्रेणीतील विविध ईव्ही विभागांसाठी हब मोटर्स तयार करतील. ग्राहकांच्या गरजा आणि प्रकल्पाच्या मुदतींसाठी सर्वात योग्य आणि जलद वेळेत लवचिक आणि मॉड्यूलर मोटर डिझाइनसह फ्लॅश कस्टमायझेशनसह मोटर्स पुरवू शकते. जोडीला फ्लॅशला जीईएम मोटर्सच्या २० जागतिक पेटंटमध्ये अॅक्सेस मिळेल आणि ते जागतिक उत्पादन केंद्र देखील बनेल.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-राज्याचे-मुख्यमंत्री-ए/

लहान इलेक्ट्रिक टू व्हीलर्स  ते मोठ्या इलेक्ट्रिक बसेस पर्यंत 1 kW ते 540 kW पर्यंत इलेक्ट्रिक वाहन मोटर्सची विस्तृत आणि मजबूत श्रेणी असलेली भारतातील पहिली कंपनी बनण्यासाठी फ्लॅश आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर यशस्वीरित्या सहयोग करत आहे. हे तांत्रिक सहकार्य म्हणजे तीन महिन्यांतील आघाडीच्या जागतिक कंपन्यांबरोबरची दुसरी आंतरराष्ट्रीय भागीदारी आहे. या धोरणात्मक भागीदारीमुळे कंपनीच्या प्रतिष्ठित ग्राहकांसाठी मोठ्या खर्चात बचत करण्याकरता प्रगत तंत्रज्ञान, प्राविण्य आणि नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे शक्य होईल.

जीईएम मोटर्सचे मॉड्युलर मल्टीफेज मोटर तंत्रज्ञान त्यांचे वजन आणि ट्रान्समिशन खर्च कमी करून एकूणच योग्य परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करून देत इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टीमच्या सर्व घटकांना कॉम्पॅक्ट सोल्यूशनमध्ये एकत्रित करते आणि वाहनांचे विद्युतीकरण सुलभ करते. वर्धित सुरक्षा आणि विश्वासार्हता, रिडंडंसी वाढवणारे मॉड्यूलर डिझाइन आणि संपूर्णपणे एकात्मिक इन-व्हील ड्राइव्ह जे वजन लक्षणीयरीत्या कमी करते आणि एकूण ड्राइव्ह सिस्टमची कार्यक्षमता वाढवते अशी प्रगत वैशिष्ट्ये या पोर्टफोलिओमध्ये आहेत.

तांत्रिक सहकार्यावर बोलताना, फ्लॅशचे व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव वसदेव म्हणाले: “जागतिक मोबिलिटी प्रवाहाच्या अनुषंगाने आणि भारताच्या आगामी इलेक्ट्रिक वाहन परिसंस्थेला  बळकट करण्यासाठी जेईएम मोटर्स या विलक्षण कंपनीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. भारतात जेईएम मोटर्सच्या पेटंट असलेल्या मॉड्युलर मल्टीफेज मोटर तंत्रज्ञानाच्या निर्मितीचा आणि जगभरातील ईव्ही ओईएमना सेवा पुरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांच्या गतिशीलता आवश्यकतांसाठी नाविन्यपूर्ण प्रणीत घटकांसह शाश्वत गतिशीलतेला चालना मिळेल. भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत धोरणात्मक आणि वैशिष्ट्यपूर्ण असण्यासोबतच ही भागीदारी जागतिक स्तरावर ईव्ही मोटर्ससाठी वन-स्टॉप सोल्यूशन पुरवठादार होण्याच्या आमच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहे. फ्लॅश ही आता भारतातील पहिली कंपनी आहे जिच्याकडे टू/थ्री व्हीलर, पॅसेंजर कार, एलसीव्हीज, इलेक्ट्रिक बस सह एचसीव्हीज यात 1kW ते 540kW पर्यंतच्या मोटर्सचे उत्पादन पोर्टफोलिओ आहे.”

जीईएम मोटर्सचे पीएचडी, सीईओ श्री. सायमन माडेल्ज म्हणाले: “आमच्या उपाय सुविधा या कमी भागांसह दूरदर्शी नाविन्यपूर्ण डिझाइन असून साधेपणा आणि उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी ज्या प्रभावीपणे जागेचा योग्य पुरेपूर वापर करतात. फ्लॅश सारखा मजबूत भागीदार मिळाल्याने आम्हाला आनंद होत आहे आणि उत्पादनातील उत्पादन आणि गुणवत्तेवर असलेला त्यांचा भर आम्हाला जागतिक बाजारपेठेत नवीन उंची गाठण्यास सक्षम करेल.”

ते पुढे म्हणाले: “जीईएम मोटर्सने त्यांच्या मोटर्सच्या श्रेणीसाठी युरोप, उत्तर अमेरिका आणि इतर देशांमधील १५ पेक्षा जास्त ग्राहक आधीच ऑन-बोर्ड केले आहेत आणि फ्लॅश सोबतच्या सहयोगासह ते भारतात त्यांचे स्थान आणखी मजबूत करण्याचा विचार करत आहेत.”

२ आणि ३ व्हीलर ओईएमसाठी इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक भागांचे उत्पादन करणारे फ्लॅश हे संपूर्ण भारत आणि जगभरात एक प्रसिद्ध नाव आहे आणि गेल्या तीन दशकांमध्ये त्यांनी स्वतःचे नाव कमावले आहे. ट्रॅक्शन मोटर्स, कंट्रोलर्स, डीसी-डीसी कन्व्हर्टर्स, ब्रशलेस डीसी मोटर्स, वाहन-विशिष्ट चार्जिंग बॉक्स, बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणि इतर संबंधित उत्पादने यांसारख्या इलेक्ट्रिक २ आणि ३ चाकी वाहनांसाठी पार्ट्सचे उत्पादन करणाऱ्या देशातील पहिल्या काही कंपन्यांपैकी ती होती.

फ्लॅशने आतापर्यंत ईव्ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि पुढील दोन वर्षांत आणखी १५० कोटी रुपयांची भर घालण्याची त्यांची योजना आहे. त्या पुढे जाऊन फ्लॅश आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन ऑफर आणि उत्पादने यांची भर घालत भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत आपले स्थान आणखी मजबूत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here