मुंबई : अंधेरी पश्चिम, सावली वसतीगृह येथे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला उत्पादन विक्री केंद्राचे उद्घाटन मंत्री श्री.लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कौशल्यपूर्ण विविध वस्तूंची निर्मिती करण्यात येते. आज सुरू होणाऱ्या विक्री केंद्राच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत होईल. माविम ने ‘टिसर’ सोबत केलेली भागीदारी या विक्री केद्रांसाठी निश्चितच महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्रातील काही निवडक कारागिर महिला चंद्रपूर मधील बांबू काम, कारपेट युनिट, गोंदियातील लाख युनिट, ठाण्यातील वारली आर्ट व मुंबईतील टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणा-या महिलां, भंडारा जिल्ह्यातील काथ्या काम करणा-या कारागीर महिलांचा सत्कार करण्यात आला.
ॲक्सीस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस या वेळी उपस्थित होत्या.त्यांनी महिलांना बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा त्यांना विश्वास असतो की महिला कर्ज परतफेड वेळेत आणि पूर्ण करतील. बॅंकाकडून मिळालेल्या ६३००/- कोटी कर्जाची परतफेड ९९ टक्के होत आहे असेसांगितले.
यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. महिला व बालविकास विभागाच्या प्रधानसचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक इंदुराणी जाखर, ॲक्सीस बँकेच्या उपाध्यक्ष अमृता फडणवीस, टिसर् संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
[…] मुंबई– उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा चालू आहेत .काळ गणिताच्या पेपरची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असल्याची बातमी आली. परंतु,ही प्रश्नपत्रिका राज्यातील विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आले नाही. यामुळे इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.http://sindhudurgsamachar.in/maharashtra-बचतगटांच्या-उत्पादना… […]
[…] कणकवली:— छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शाने पुनित असलेल्या नांदरुख गावची ग्रामदेवता श्री देव गिरोबा देवस्थानला “क” वर्ग तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेतंर्गत मंदिर परिसर सुशोभीकरण या कामी रूपये १० लाख आणि ग्राम सुविधा योजनेतंर्गतही ग्रामपंचायत इमारत विस्तारीकरण करिता रूपये १० लाख असा भरघोस निधी प्राप्त झाला आहे. आ. वैभव नाईक आणि त्यांच्या सहकार्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती या गावचे ज्येष्ठ पत्रकार, कामगार नेते गणपत तथा भाई चव्हाण यांनी येथे दिली. http://sindhudurgsamachar.in/maharashtra-बचतगटांच्या-उत्पादना… […]