Maharashtra: बार, पबमध्ये अल्पवयीन मुले आल्यास AI तात्काळ देणार अलर्ट

0
27
बुलेट कॅमेरे ,AI
बार, पबमध्ये अल्पवयीन मुले आल्यास AI तात्काळ देणार अलर्ट

बारच्या प्रवेशद्वारावर उच्चप्रतीचे बुलेट कॅमेरे

मुंबई: पब, डिस्को आणि बारमध्ये मद्यपान करण्यासाठी येणाऱ्या अल्पवयीन मुलांची ओळख पटविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे, मुंबईसह महत्वाच्या शहरातील प्रत्येक पब आणि बारच्या प्रवेशद्वारावर उच्चप्रतीचे बुलेट कॅमेरे बसविण्यात येणार आहे. हे कॅमेरे ‘एआय’ (AI) तंत्रज्ञान संबंधित सॉफ्टवेअरला कनेक्ट असणार असून, त्याचे सॉफ्टवेअर हद्दीतील उत्पादन शुल्क विभागाच्या कक्षातील निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मोबाईल फोनमध्ये असणार असून त्यांना त्यात २१ वर्षांच्या खालील तरुण बार किंवा पबमध्ये प्रवेश करीत असेल तर अलर्ट येईल आणि निरीक्षक दर्जाचे अधिकारी त्या संबंधित ठिकाणी जाऊन संशयित तरुण-तरुणीचे वयाचे पुरावे तपासून खात्री करणार आहेत. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुख्यमंत्री-युवा-कार्य/

हिट अँड रन सारख्या घटनांवर आवर घालण्यासाठी पोलीस यंत्रणा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून वेगवेगळे उपाय करण्यात येत आहेत. २१ वर्षांखालील मुलांना मद्यविक्री करू नये हा नियम आहे, मात्र बार, पबमध्ये सर्रासपणे अल्पवयीन मुलांना प्रवेश देऊन मद्यविक्री केली जात आहे, परंतु यापुढे बार आणि पबमध्ये येणाऱ्या अल्पवयीन मुलांना रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एआय (AI) या तंत्रज्ञानाचा वापर शहरातील प्रत्येक बार आणि पबमध्ये केला जाणार आहे. बार, पबच्या प्रवेशद्वारवर बसविण्यात येणारी सी.सी.टी.व्ही. यंत्रणा, बॅकअप यंत्रणा, इन्व्हर्टर यंत्रणा इत्यादीची देखभाल व दुरुस्ती वेळेत करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकाची असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here