*झेंडूची फुले अभियानांतर्गत कृषी फाऊंडेशनच्या माध्यमातून गतवर्षीपासून कृषी विपणन पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीचा कृषी विपणन पुरस्कार 2024 हा सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथील कुटीर उद्योजक भीमराव मल्लिकार्जुन मगर यांना जाहीर करण्यात येत आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा पुरस्कार हिंगोलीच्या बाजारपेठेत त्यांना देण्यात येणार आहे.
भीमाशंकर मलिकार्जुन मगर रा. वरुड चक्रपान ता. सेनगाव जि. हिंगोली येथील आहेत. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/
भीमाशंकर हे सुरुवातीला येलदरी येथे एका किराणा दुकानावरती काम करत होते. बाजाराच्या दिवशी ते लाल मिरच्या विकायचे. सन 2019 मध्ये भीमाशंकर झेंडूची फुले अभियानाच्या संपर्कात आले. त्यांनी वरुड चक्रपान येथे गावकऱ्यांच्या मदतीने रोडच्या बाजूने बाराशे झाडे लावली. हळूहळू झाडे वाढत होती तशी भीमाशंकर यांच्या मनामध्ये परंपरागत पद्धतीने उद्योग सोडून शेतकरी ते ग्राहक सरळ विक्री करण्याचे नियोजन केले. मिरच्या विकत असल्यामुळे मिरचीचे पावडर, गावराणी येसोर, काळा मसाला, हळद, सर्व डाळी, पापड्या, खारवड्या, ज्वारी, गहू विकण्याचे नियोजन त्यांनी केले. झेंडू फुले अभियानाच्या ग्रुपमध्ये मेसेज टाकून त्यांनी शहरापर्यंत हा प्रक्रिया केलेला शेतमाल विकण्याचे नियोजन केले. मोठ्या प्रमाणात हिंगोली शहरातील शेतकऱ्याची मुलं ग्राहक म्हणून त्यांना मिळाली. त्यांनी घरपोच हा प्रोसेसिंग केलेला शेतमाल द्यायला सुरुवात केली. कोरोनाच्या काळात त्यांचा हा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला. हळूहळू हा उद्योग वाढतच गेला.
आज घडीला रिसोड,सेनगाव, हिंगोली येथे बाजार हॉटेल आणि घरपोच दर महिन्याला किमान तीन लाख रुपयाचा शेतमाल ते विक्री करतात. भीमाशंकर यांनी तयार केलेला शेतमाल हा चांगला असल्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे ग्राहक वाढत जात आहेत. गावात लावलेली झाडेही दहा-बारा फुटापर्यंत वाढले आहेत. त्यांचा हा कुटीर उद्योग ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे.
कृषी फाऊंडेशनच्या माध्यमातून दिला जाणारा ‘ कृषी विपणन पुरस्कार 2024 हिंगोली हा भीमाशंकर मलिकार्जुन मगर यांना देत असताना आनंद होतो आहे. याच पद्धतीने शेतकऱ्याच्या मुलांनी विक्री करण्यासाठी समोर यावे. हाच अभियानाचा उद्देश आहे.
हा पुरस्कार दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झेंडू फुले अभियानाच्या माध्यमातून बाजारात त्यांना दिल्या जाईल. शेतमाला बरोबरच उद्योजक शेतकऱ्याचा सन्मान केल्या जाईल.
झेंडूची फुले अभियान हिंगोली महाराष्ट्र ( +918600753716 ) भीमाशंकर मगर यांचा मोबाईल नंबर उद्योजक नगर यांना प्रोत्साहन व शुभेच्छा देण्यासाठी हा नंबर या ठिकाणी देत आहे…