Maharashtra: ‘मला एक खून माफ करा’, राज ठाकरे यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

0
9
'मला एक खून माफ करा', राज ठाकरे यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या
'मला एक खून माफ करा', राज ठाकरे यांच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

मुंबई: विधानसभा निवडणूक आचारसंहिता आज किंवा उद्या जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नुकताच विविध पक्ष आणि नेत्यांचा दसरा मेळावा पार पडल्यानंर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता मेळावा रविवारी मुंबई येथे पार पडला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान, त्यांनी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये सेल्फी आणि फोटो काढणाऱ्या मंडळींवर तीव्र नाराजी व्यक्ती केली. मी राष्ट्रपतींकडे विनंती करेन. मला एक खून माफ करा. मला ती संधी जर मिळाली.. तर मी ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा उपलब्ध करुन दिला त्याचा खून करेन, अशी मिष्कील टीप्पणी त्यांनी यावेळी केली. https://sindhudurgsamachar.in/kokan-महाविकास-आघाडीच्या-वतीन-2/

राज्यात सुरु असलेल्या युत्या, आघाड्या आणि पक्ष फोडाफोडी यांवरुनही राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. आज कळतच नाही कोण कोणत्या पक्षात आहे. केव्हाही उठायचे कोणतीही आघाडी स्थापन करायची. लगेच त्यातून बाहेर पडत वेगळेच सरकार स्थापन करायचे, असे उद्योग सुरु आहेत. अनेकांनी दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातील भाषणे पाहिली तर उद्धव ठाकरे हे इतिहासातूनच कधी बाहेरच येत नाहीत. ती वाघनखं, कोतळा, अब्दाली असे काहीतरी बोलत असतात. महाराष्ट्रावर कधी बोलणार? असा सवाल उपस्थित करतानाच पुष्पा स्टाईलने हात फिरवत राज यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांचीही मिमिक्री केली.

महाराष्ट्राला कुरतडण्याचे काम सध्या सुरु आहे. त्यासाठी देशभरातून प्रयत्न होत आहेत. नुकतेच उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रच काय अवघा देशही हळहळला, तुम्हाला इतर कोणत्याही क्षेत्रात भ्रष्टाचारी नसलेला व्यक्ती हवा असतो. निकोप व्यक्तीमत्त्व हवे असते तर मग राजकारणात तुमचा तो आग्रह का नसतो? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. याच वेळी त्यांनी एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या हातात सत्ता द्या. असा महाराष्ट्र घडवतो, जो कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही. इतकेच नव्हे तर दिल्लीत कोणाचेही सराकर येऊदे.. तो कधीही तुटणार फुटणार नाही, असा महाराष्ट्र उभा करुन दाखवतो, असा विश्वास राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. दरम्यान, राज ठाकरे यांनी उद्योगपती रतन टाटा यांना आपले भाषण थांबवून स्तब्ध उभे राहून श्रद्धांचली वाहीली. तसेच, आगामी निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाशी युती न करता आपण स्वतंत्र निवडणूक लढवू. स्वबळावरच सत्ता आणू, असेही राज ठाकरे यांनी यावेळी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here