Maharashtra: महायुतीच्या प्रचाराचा नारळ २० रोजी कोल्हापुरात फुटणार

0
29
महायुती
महायुतीच्या प्रचाराचा नारळ २० रोजी कोल्हापुरात फुटणार

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने कंबर कसली असून, येत्या २० ऑगस्टला कोल्हापूर येथे अंबाबाईचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची संयुक्त सभा होणार आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शासनाच्या-हर-घर-तिरंगा-य/

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर महायुतीच्या समन्वय समितीची बैठक झाली. गुरुवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान सुरू झालेली ही बैठक रात्री अडीच वाजता संपली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसेच समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या संयुक्त प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. तिन्ही पक्षाकडून पक्षाकडून संयुक्त सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहेत. त्याचा प्रारंभ २० ऑगस्ट रोजी कोल्हापुरात होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाल्याने विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीपुढे सत्ता राखण्याचे आव्हान आहे.

येत्या २० तारखेपासून राज्यात ठिकठिकाणी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या जाहीर सभा होणार आहेत. तसेच ७ विभाग आणि २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याचा निर्णय झाला. तसेच विभाग स्तरावर या तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here