Maharashtra: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, मुंबई पालकमंत्री यांनी भंडारी समाज भवनासाठी उपलब्ध केली जागा

0
6
मुख्यमंत्री शिंदे,भंडारी समाज भवन,
भंडारी समाज भवनासाठी उपलब्ध केली जागा

भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष श्री.रुपेश पावसकर यांनी मानले आभा
🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार –
मुंबई- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) मा.ना. दिपकभाई केसरकर यांनी भंडारी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल भंडारी समाजाचे माजी युवा बिग्रेड जिल्हाध्यक्ष श्री.रुपेश पावसकर यांनी आभार व्यक्त करताना मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब,राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा मंत्री (मुंबई पालकमंत्री) मा.ना.दीपकभाई केसरकर हे व्हिजन असणारे नेते असल्याचे गौरोद्गार व्यक्त केले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शंभर-दोनशेचा-स्टॅम्प-इत/

या दोन्ही नेत्यांनी भंडारी समाजाचे प्रेरणास्थान असलेले भागोजी कीर यांचे स्मारक उभारणीसाठी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाला जागा उपलब्ध करून मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब, मा.ना.दीपकभाई केसरकर यांनी भंडारी समाजाप्रती आपण सदैव पाठीशी असल्याची खात्री या दोन्ही नेत्यांनी दिली.या स्मारकासाठी रुपये २० कोटी व लागणारी जागा मंजूर करून या कामाचा भूमिपूजन सोहळा दि.१३ मार्च २०२४ रोजी पार पडला. मा.ना.एकनाथजी शिंदे,मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे आभासी दृष्याद्वारे उपस्थित होते,तर मा.ना. दिपकभाई केसरकर,शालेय शिक्षण तथा मराठी राष्ट्रभाषा(मुंबई पालकमंत्री) हे मैत्र जीवांचे कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.हे मंजूर करण्यासाठी महासंघाचे अध्यक्ष श्री.नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे देखील विशेष कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here