Maharashtra: महाराष्ट्रातील टेबल टेनिसपटू साठी भिवंडकर यांची विशेष कार्यशाळा

0
30
महाराष्ट्रातील टेबल टेनिसपटूनसाठी भिवंडकर यांची विशेष कार्यशाळा
महाराष्ट्रातील टेबल टेनिसपटूनसाठी भिवंडकर यांची विशेष कार्यशाळा

जगदीप भिवंडकर हे  भारतीय महसूल सेवा येथून नुकतेच निवृत्त झाले असून  सेंट्रल जी. एस.टी. येथे असिस्टंट कमिशनर या पदावर ते कार्यरत होते. या दोन कार्यशाळेनंतर महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्यात देखील अशा कार्यशाळांचे आयोजन करून गुणवान खेळाडूंना हेरून त्यांच्यातून पदक विजेते खेळाडू घडविण्याचे कार्य सुरु ठेवण्यात येणार आहे.

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l सोलापूर –

भारताच्या जुनिअर टेबल टेनिस संघाचे प्रशिक्षक म्हणून कार्य करताना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला ९ सुवर्ण, १३ रौप्य आणि २५ कांस्य पदके मिळवून देणाऱ्या जगदीप एस. भिवंडकर यांनी टेबल टेनिस खेळाडूंनी कठीण परिस्थितीत तसेच तणावपूर्ण प्रसंगात आपला खेळ कसा उंचवावा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे.  याची सुरुवात ९ मार्चला  सोलापूर जिल्हा टेबल टेनिस अससोसिएशनच्या सहकार्याने सोलापूर येथे तर १० मार्च रोजी उस्मानाबाद जिल्हा टेबल टेनिस अससोसिएशनच्या सहकार्याने उस्मानाबाद येथे होणार आहे. या  कार्यशाळेत केवळ खेळाडूंचेच नव्हे तर त्यांच्या पालकांचे देखील समुपदेशन करण्यात येणार असून खेळाडूंनाही त्यांचे खेळातील कौशल्य कसे विकसित करायचे आणि आपला सर्वोत्तम खेळ करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके कशी मिळवावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पितांबरीचे-रवींद्र-प्र/

भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासात पहिल्यांदाच जगदीप भिवंडकर एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन आले असून याच कार्यक्रमातून भारताला भविष्यात पदके मिळवून देऊ शकतील अशा महाराष्ट्रातील  वंचित आणि पॅरा खेळाडूंसह  गुणवान खेळाडूंचाही  शोध घेण्यात येणार आहे.  यासाठी मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभागात हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून यातून गुणवान मुलांची निवड करून त्यांना  एक वर्षासाठी भिवंडकर यांचे मार्गदर्शन आणि मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रकुल महासंघाच्या पॅरा (लेव्हल वन) प्रशिक्षक असणारे जगदीप भिवंडकर हे भारतातील पहिले आणि एकमेव प्रशिक्षक आहेत ज्यांची भारतीय टेबल टेनिस महासंघ आणि आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाने त्यांना पॅरा मेंटॉरशिप प्रोग्रॅम साठी नामनिर्देशित केले आहे.  भिवंडकर हे सध्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या पॅरा कमिटीचे चेअरमन देखील असून गुड डीड वेल्फेअर फौंडेशन  आणि आर.एन.एफ. वेल्फेअर असोशिएशन यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी जगदीप भिवंडकर यांच्याशी ९८२१२०७००७  या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार असून त्यांच्या तारखा आणि ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत –

 रविवार  ९ मार्च  – सोलापूर जिल्हा टेबल टेनिस अससोसिएशन

१. सत्र पहिले – सायंकाळी ४.०० ते ५.१५ –  अगदी नवोदित आणि अन्य खेळाडूंसाठी

२. सायंकाळी ५.१५ ते ६.०० – खेळाडूंच्या पालकांशी संवाद

३. सत्र दुसरे –  सायंकाळी ६.०० ते ७.३० – प्रगत खेळाडू, वयस्कर आणि पॅरा खेळाडूंसाठी

सोमवार १० मार्च – उस्मानाबाद जिल्हा टेबल टेनिस अससोसिएशन

४. सत्र तिसरे    –  सकाळी ७.३० ते ९.००    – प्रगत खेळाडू, वयस्कर आणि पॅरा खेळाडूंसाठी

५. सत्र चौथे     –   सकाळी ९.०० ते १०.००  –  अगदी नवोदित आणि अन्य खेळाडूंसाठी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here