Maharashtra: महिला उद्योजकांनी सक्षम होत आत्मनिर्भर  व्हावे  यासाठी  FedEx चे प्रयत्न सुरूच

0
36
 FedEx,
महिला उद्योजकांनी सक्षम होत  आत्मनिर्भर  व्हावे  यासाठी  FedEx चे प्रयत्न सुरूच

मुंबई, 28 मे 2024: FedEx Corp. (NYSE: FDX) ची उपकंपनी आणि जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक FedEx एक्सप्रेस (FedEx) ने ‘सक्षम’ उपक्रमाद्वारे  महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आपली वचनबद्धता अधिक दृढ केली आहे. युनायटेड वे मुंबई (UWM) च्या सहकार्याने, FedEx ने कमीउत्पन्न गटातील 110 पेक्षा जास्त महिला  उद्योजकांना त्यांचे व्यवसाय  वाढविण्यात मदत करत  सक्षम किटचे  वाटप केले.https://sindhudurgsamachar.in/kokan-दहावीच्या-निकालात-पुन्ह/

2021 मध्ये हा उपक्रम लाँच करण्यात आला. तेव्हापासून हजारो लघुउद्योग महिला व्यावसायिकांना या किट्सचा फायदा झाला आहे. 2021 ते 2023 दरम्यान या किट्सच्या साहाय्याने 62%  उद्योजकांनी  त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाल्याचे सांगितले आहे. त्यांच्या रोजच्या जगण्यावरही याचा परिणाम निश्चितच झाला आहे.

आर्थिक अडचणी किंवा साधनांच्या कमतरतेमुळे ज्या कुशल महिला व्यावसायिकांना व्यवसायात अडचणी निर्माण होतात अशा महिलांना ‘सक्षम’ टूल किट उपलब्ध करून देते. घर सजवण्याच्या गोष्टी, टेलरिंग, घरगुती उत्पादने, पेडल रिक्षा आणि अन्य विविध क्षेत्रातील व्यवसायांच्या गरजेनुसार तयार केलेल्या या किट्समध्ये उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी, उत्पादन कार्यक्षमता वाढवण्यासाठी  आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक साधने आहेत.

FedEx मधील MEISA चे भारतातील तसेच ग्राहक अनुभव आणि ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी यांनी या उपक्रमाच्या व्यापक परिणामांवर भर दिला, “महिलांना सक्षम बनवण्याची जबाबदारी घेणे, आणि त्यात गुंतवणूक करणे यावर आम्ही विश्वास ठेवतो. महिलांच्या आर्थिक सहभागातील अडथळे दूर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच आजपर्यंत हजाराहून अधिक लाभार्थींना पाठिंबा दिल्याने, आमचेही यात योगदान असल्याची जाणीव होते, तसेच समान वाढीच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करण्यास अनुमती देते. विविधता आणि सर्वसमावेशकता स्वीकारणे हे केवळ नैतिकरीत्या गरजेचे नाही तर कोणत्याही देशाच्या विकासासाठी मूलभूत घटक म्हणूनही महत्त्वाचे आहे.

जागतिक बँकेने मध्यंतरी केलेल्या सर्वक्षणानुसार, रोजगारातील स्त्री – पुरुष अशी तफावत बंद केल्यास दरडोई जीडीपी  सुमारे 20% नी वाढू शकतो.  यामुळेच ‘सक्षम’  सारख्या  मोठ्या  प्रमाणात  समुदायांना लाभ देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होते.

जॉर्ज आयकारा, मुख्य कार्यकारी अधिकारी, UWM म्हणाले, “जेव्हा स्त्रिया यशस्वी होतात, तेव्हा समाजाची भरभराट होते. अनेकदा महिलांकडे  कौशल्य,  व्यवहारज्ञान असते  पण  आर्थिकदृष्ट्या त्या सक्षम  नसतात किंवा साधनांची कमतरता असते.  यामुळे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही.  महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात भरभराट होण्यासाठी,  आवश्यक  भांडवल  मिळवून देत त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी Saksham टूलकिट अत्यंत उपयोगी आहे. भारतात लैंगिक समानता आणण्यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने प्रगतीचा  वेग वाढवण्यासाठी FedEx सह आम्ही कार्यरत आहोत.

ग्राहकांना प्राधान्य देणारे FedEx आजच्या जागतिक लँडस्केपमध्ये सांस्कृतिक विविधता, समानता आणि सर्वसामावेशकतेचे महत्त्व समजून घेत त्याला बढावा देते. सर्व प्रकारच्या व्यवसायांसाठी उत्कृष्ट कौशल्य टिकवून ठेवणे, व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवणे, सर्वप्रकारच्या आणि सर्व स्तरातील ग्राहकांना आकर्षित करणे तसेच टिकवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी एक चांगली जागा निर्माण करण्यात योगदान देणे या सर्वांसाठी FedEx वचनबद्ध आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here