🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई –
महिला व बालविकास विभागाच्या योजनांद्वारे राज्यातील महिला व बालकांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या योजनांना अधिक गती मिळावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. या बैठकीत विभागाचे सचिव अनुपकुमार यादव देखील उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महापारेषणच्या-राज्य-भा/
बैठकीदरम्यान मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षम अंगणवाडी आणि पोषण’ उपक्रम, ‘मिशन वात्सल्य’, ‘मातृवंदना योजना’ आणि ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ यासारख्या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. या योजनांवरील खर्च, तसेच अद्याप खर्च न झालेल्या निधीबाबत सविस्तर माहिती त्यांनी विभागाकडून घेतली.
महिला व बालकांच्या सशक्तीकरणासाठी या योजनांमध्ये जलद कार्यवाही करण्याचे त्यांनी विभागाला निर्देश दिले.