Maharashtra: ‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन

0
49
ग्रंथाली प्रकाशन,एनसीपीए
‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l शैलेश कसबे l मुंबई

ग्रंथाली प्रकाशन आणि एनसीपीएच्या संयुक्त विद्यमाने माजी सहजिल्हा निबंधक तसेच लेखक धनराज खरटमल यांच्या ‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या हस्ते नुकतेच एनसीपीए नरिमन पॉईंट येथे झाले. मालमत्ता खरेदी करताना खरेदीदारांनी कोणती काळजी घ्यावी, मालमत्ता खरेदीदारांची नेमकी जबाबदारी काय, या संदर्भात मालमत्ता हस्तांतरण कायदा तसेच नोंदणी कायद्यात कोणकोणत्या तरतूदी आहेत याचाही ऊहापोह त्यांनी केला. तसेच मुंबईमध्ये फ्लॅटच्या किंमतवाढीची नेमकी कारणे काय आहेत, हे सुध्दा त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी डॉ. नितीन करीर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. https://sindhudurgsamachar.in/latest-e-paper/

यावेळी उदयराज चव्हाण, नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय पुणे), अधिकराव पोळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (बांद्रा विभाग) , डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी लेखक धनराज खरटमल यांच्या ‘मालमत्ता खरेदी करताना’ या पुस्तकाबद्दलचे आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्यावेळी ऋतु ग्रुप ॲाफ कंपनिजचे व्यवस्थापकीय संचालक, मुकुंद पटेल आणि देशमुख बिल्डर्स प्रा. लि.चे चेअरमन, मोहन देशमुख हे सुध्दा व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचे संवादन डॉ. लतिका भानुशाली यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here