Maharashtra: मुंबईत दोन नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू करून एथर एनर्जीने आपली उपस्थिती वाढवली

0
56
एथर एनर्जी,
मुंबईत दोन नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स सुरू करून एथर एनर्जीने आपली उपस्थिती वाढवली

–          ही नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स पनवेल आणि ठाणे येथे आहेत

–          या नवीन सेंटर्समध्ये एथर 450 सिरीज आणि रिझ्टा या गाड्या टेस्ट राइडसाठी आणि खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील

–          मुंबईत आता एथरची 05 रिटेल दुकाने आणि 05 सर्व्हिस सेंटर्स आहेत

मुंबई आणि नवी मुंबई, ३ जून 2024: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी एथर एनर्जीने पनवेल आणि ठाणे येथे दोन नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्स (ECs) उघडून मुंबईतील आपली उपस्थिती आणखी मजबूत केली आहे. अंधेरी, उल्हासनगर आणि वसई बरोबरच या दोन नवीन केंद्रांसह आता एथर एनर्जीची मुंबईत एकूण 5 ECs आहेत. या नवीन एक्सपिरीयन्स सेंटर्समध्ये ग्राहक आता एथर 450X, एथर 450S, एथर अपेक्स तसेच अलीकडेच लॉन्च झालेल्या रिझ्टा या त्याची पहिल्या फॅमिली स्कूटर सहित एथरच्या सर्व स्कूटर्सची टेस्ट राईड घेऊ शकतील. रिझ्टाचे आगाऊ बुकिंग आता एथर वेबसाइटवर सुरू झाले आहे आणि जूनपासून त्यांच्या एक्सपिरीयन्स सेंटर्सवर टेस्ट राईडसाठी आणि खरेदीसाठी या गाड्या उपलब्ध असतील. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिवराज्याभिषेक-महोत्स/

या प्रसंगी बोलताना एथर एनर्जीचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. रवनीत सिंह फोकेला म्हणाले, “आमच्यासाठी मुंबई ही अग्रक्रम असलेली बाजारपेठ आहे आणि आमच्या अगदी पहिल्या एक्सपिरीयन्स सेंटरच्या उद्घाटनापासूनच येथे आमचा समुदाय फोफावत चालला आहे. आमच्या ग्राहकांना वाहनाच्या मालकीचा त्रास-मुक्त अनुभव प्रदान करण्यासाठी आम्ही या शहरात सक्रियतेने आमची रिटेल दुकाने आणि सर्व्हिस सेंटर्स सुरू केली आहेत.

रिझ्टा या आमच्या नवीन उत्पादनाच्या लॉन्चसह आम्ही आमच्या स्कूटर्ससाठी या शहराकडून मागणी वेगाने वाढत असलेली पाहात आहोत. ही वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबईत सध्या आमची 5 एक्सपिरीयन्स सेंटर्स आहेतज्यांच्यामुळे लोक आमच्या उत्पादनांपर्यंत सुलभतेने पोहोचू शकतील. गेल्या काही वर्षांत आम्हाला आमच्या 450 सिरीजसाठी या शहरातील EV च्या चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि तसाच प्रतिसाद आता रिझ्टाला देखील मिळेल अशी आम्हाला आशा आहे.”

आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट ग्राहक सेवा आणि पोहोच प्रदान करण्याबाबत एथर वचनबद्ध आहे. या कंपनीची सध्या मुंबईत 5 एक्सपिरीयन्स सेंटर्स आहेत, जी उल्हासनगर, अंधेरी, वसई, पनवेल आणि ठाणे अशी मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आहेत. या व्यतिरिक्त, पनवेल, ठाणे, अंधेरी, उल्हासनगर आणि वसई येथे एथरची 5 सर्व्हिस सेंटर्स देखील आहेत. एथरने ज्या ज्या शहरात एक्सपिरीयन्स सेंटर्स उघडली आहेत, तेथेच सर्व्हिस सेंटर देखील असेल याची काळजी एथरने घेतली आहे. ही सर्व्हिस सेंटर्स मोबईल सर्व्हिस व्हॅन आणि सर्व्हिस कॅम्पसारख्या सेवांसहित ग्राहकांना सुलभतेने सर्व्हिस उपलब्ध करून देते. शिवाय, एथर एक्सप्रेस केअर सारख्या विविध सेवा ग्राहकांना झटपट 60 मिनिटांची नियतकालिक सेवा सहजपणे मिळवून देते. एथर एनर्जीने मुंबईत 50+ आणि संपूर्ण  महाराष्ट्रात आणि 200+ एथर ग्रिड बसवली आहेत.

अजमेरा ग्रुपचे मॅनिजिंग पार्टनर श्री. जमीर अजमेरा म्हणाले, “एथर एनर्जी सोबत हा रोमांचक प्रवास करताना उत्कृष्टतेबद्दलची आमची वचनबद्धता अढळ आहे. एथर एनर्जीच्या नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटर्स वाहतुकीच्या भविष्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत आणि त्या शाश्वतता आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या बाबतीतील आमच्या निष्ठेशी संपूर्ण मिळत्या जुळत्या आहेत. एथर इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या महत्तम विक्रीसाठी आमचा व्यापक अनुभव आणि बाजारपेठेची सखोल समज यांचा फायदा करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

एक अभूतपूर्व ग्राहक अनुभव प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे ज्यातून आम्ही हे दर्शवू इच्छितो की अजमेरा ग्रुपशी संबंध नेहमी मूल्य आणि समाधान यात वृद्धी करणारा असतो.”

ठाण्यात EC च्या उद्घाटनाच्या निमित्ताने बोलताना ऑटोमजेट ऑटोमोबाइल्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनिजिंग डायरेक्टर श्री. आशुतोष घोसाळकर म्हणाले, “ठाण्यात एथर एनर्जी डीलरशिप आणि सर्व्हिस सेंटर सुरू करत असल्याचे जाहीर करताना ऑटोमजेट ग्रुपला अभिमान वाटत आहे. हा उपक्रम म्हणजे असामान्य ग्राहक सेवा आणि शाश्वत वाहतूक उपाययोजना प्रदान करण्याच्या आमच्या ग्रुपच्या मिशनला अनुसरून उचललेले पुढचे पाऊल आहे. ही नवीन एथर एनर्जी डीलरशिप आधुनिक इलेक्ट्रिक वाहने आणि व्यापक सर्व्हिस सुविधा देऊ करेलजी ईको-फ्रेंडली मोबिलिटी आणि ग्राहक संतुष्टीप्रती असलेली ऑटोमजेट ग्रुपची निष्ठा दर्शवते.”


आरामदायकता, सुविधा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डिझाईन केलेल्या रिझ्टामध्ये ऐसपैस आणि आरामदायक सीट, भरपूर बूट स्पेस आणि स्किडकंट्रोलTM, फॉलसेफTM, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS), चोरी आणि टो डिटेक्शन आणि पिंग माय स्कूटर सहित अनेक सुरक्षा फीचर्स आहेत. रिझ्टा दोन मॉडेल्समध्ये आणि तीन प्रकारांत उपलब्ध आहे – रिझ्टा S आणि रिझ्टा Z. रिझ्टा S 2.9 kWh बॅटरीने आणि 123 किमीची IDC रेंज ऑफर करते. सुसज्ज आहे. रिझ्टा Z दोन प्रकारात उपलब्ध असून त्यात 2.9 kWh बॅटरी आणि 123 किमीची IDC रेंज आहे. दुसऱ्या प्रकारात 3.7 kWh बॅटरी आणि 159 किमीची IDC रेंज आहे. 2.9 kWh बॅटरीच्या रिझ्टा S ची किंमत INR 1,12,257 (एक्स-शो-रूम, मुंबईत) आहे. एथर रिझ्टा Z 2.9 kWh आणि 3.7 kWh दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे व त्यांची किंमत अनुक्रमे (एक्स-शो-रूम, मुंबईत) INR 1,27,257 आणि INR 1,47,258 आहे. काही अतिरिक्त फीचर्स देणारे प्रो-पॅक रिझ्टा S साठी 13,000 रु. जादा देऊन, 2.9 kWh बॅटरीच्या रिझ्टा Z साठी 15,000 रु जादा देऊन आणि 3.7 kWh बॅटरीच्या रिझ्टा Z साठी 20,000 रु जादा देऊन मिळवता येईल.

एथर 450S ची किंमत (एक्स-शो-रूम, मुंबईत) 1,17,700/- रु पासून सुरू होत आहे, तर 2.9 kWh बॅटरीच्या 450X ची किंमत 1,42,858 रु. (एक्स-शो-रूम, मुंबईत) पासून सुरू होत आहे आणि 3.7 kWh प्रकाराची सुरुवात 1,57,258 रु. (एक्स-शो-रूम, मुंबईत) पासून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here