पंढरपुर -महाराष्ट्र सरकारने रविवारी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळा’ची स्थापना केली. या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असेल. या महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त आयएएस अधिकार्याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. या महामंडळासाठी 50 कोटींची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या 11 जुलै रोजीच्या बैठकीत मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. रविवारी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नॅशनल-टेस्टिंग-एजन्सीन/
महाराष्ट्रातील कीर्तनकार व वारकर्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरिता तसेच कल्याणकारी योजना राबविण्याकरिता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. महामंडळाच्या माध्यमातून सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार व अन्न, निवारा, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमा कवच, पायाभूत सुविधा आदी सोयी-सुविधा पुरविण्यासोबतच कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहे.
याशिवाय, आषाढी व कार्तिकी वारीसाठी दिंड्यांना दरवर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येणार असून, पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर व इतरही तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येईल. चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
……