नांदेड- अभ्यासासाठी मोबाईल घेण्याचा तगादा लावल्यानंतर पित्याकडून मोबाईल दिला जात नसल्याने एका 17 वर्षीय युवकाने शेतामध्ये जाऊन गळफास घेतला. त्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे पाहून पित्यानेही त्याच ठिकाणी गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना नांदेडच्या बिलोली तालुक्यातील मिनकी येथे घडली आहे . पिता पुत्राच्या या आत्महत्येनंतर पैलवार कुटुंबिय आणि मिनकी गावावर शोककळा पसरली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुख्यमंत्री-देवेंद्र-फ/
मिनकी येथील राजू लक्ष्मण पैलवार हे मध्यमवर्गीय गृहस्थ आपल्या पत्नी, तीन मुलांसह राहत होते. त्यांचा ओमकार राजू पैलवार हा मुलगा इयत्ता अकरावीमध्ये शिकत होता. त्याने गेल्या काही दिवसापासून मोबाईल घेऊन देण्यासाठी पित्याकडे तगादा लावला होता. अभ्यासासाठी मोबाईल हवा असे तो सांगत होता. मात्र घरातील परिस्थितीमुळे पिता राजू पैलवार यांना मोबाईल घेऊन देणे शक्य झाले नाही. बुधवारी रात्री राजू पैलवार आणि त्यांची पत्नी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. यावेळी मुलगा ओमकार पैलवार यानेही मोबाईल देण्याची मागणी केली. मात्र पित्याने मोबाईल घेण्यास असमर्थता दर्शवली. याच रागातून ओमकार राजू पैलवार हा युवक शेतामध्ये गेला आणि त्याने गळफास घेतला.त्यानंतर वडील राजु पैलवार यांनी सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली .या प्रकरणी बिलोली पोलीसात आकस्मिक मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे.