मुंबई ११ (बातमीदार) : ‘नूतन गुळगुळे फाऊंडेशन‘ ही शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांना त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. ही संस्था मागील दोन वर्षांपासून राज्यस्तरीय आंतरशालेय दिव्यांग युवा महोत्सव आयोजित करीत आहे. https://sindhudurgsamachar.in/21-गन-सॅल्यूट-इंटरनॅशनल-कॉन/
या महोत्सवात दिव्यांगांना गायन, नृत्य आणि वादन या विभागातील आपली कला सादर करता येते. या महोत्सवासाठी महाराष्ट्रातील विविध शाळांनी आपल्या प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत असून एका शाळेला जास्तीत जास्त ६ प्रवेशिका सादर करण्याची मुभा असणार आहे. फक्त विशेष शाळांनीच या प्रवेशिका सादर कराव्यात. प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख १५ जानेवारी २०२३ असून हा महोत्सव फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार आहे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
इच्छुक विशेष शाळांनी त्यांचे अर्ज कुरिअरद्वारे पूर्ण बायोडेटा/ संक्षिप्त प्रोफाइल, सादर करावयाच्या श्रेणी/अपंगत्वाची टक्केवारी (अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) nutangulgulefoundation@gmail.com वर इमेलद्वारे पाठवावी.
अधिक माहितीसाठी संपर्क – सौ. नूतन विनायक गुळगुळे 9819141906, 9920383446