Maharashtra: राज्यातील ग्रामपंचायतीतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान 

0
115
ग्रामसेवक संप
राज्यातील ग्रामसेवकांचा संप; रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतीत अनेक रिक्तपदे आहेत. ही पदे राजीनामा,निधन,अनर्हता किंवा अन्य कारणांमुळे रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्तपदांना भरण्यासाठी १८ मे २०२३ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आधार-पॅनकार्ड-लिंकला-मु/

राज्यात सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायती असून त्यातील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ सरपंच पदे रिक्त आहेत. सर्व रिक्त पदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे. मतदानाची वेळ १८ मे २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी असून नक्षलग्रस्त व दुर्गम भागात मात्र दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होणार असल्याची माहिती, राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली आहे.

अनेक कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि थेट सरपंचपदांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होत आहे. या पदांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचा कालावधी २५ एप्रिल ते २ मे २०२३ असा असून या कालावधीत उमेदवारांना आपले अर्ज दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रे ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल आणि त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here