Maharashtra :राज्यातील विधानसभा निवडणूक तारखेबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

0
17
मतदान,विधानसभा निवडणुक,
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन मतदार संघात बुधवारी सुमारे ७२ टक्क्यापर्यंत मतदान

मुंबई – जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्र राज्याची निवडणुकही होणार होती. परंतु, निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. मात्र सध्या या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुलासा केला आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका या नोव्हेंबर महिन्यात होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. https://sindhudurgsamachar.in/आई-काळजी-करू-नकोस-मी-लवकरच/

जम्मू-काश्मीर हरियाणासोबत महाराष्ट्रातही विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र आयोगाच्या कार्यक्रमात याचा समावेश नव्हता. त्यामुळे आता निवडणूक दिवाळीनंतरच म्हणजे नोव्हेंबरच्या मध्यात जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्रात पाऊस झाल्याने बीएलओंची कामे झालेली नाहीत. राज्यात गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्र, दिवाळी यासारखे सण आहेत. सुरक्षा बलाचाही मुद्दा आहे. याचा विचार करून फक्त 2 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्याचे आयोगाने सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले.
…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here